मिका सिंगला दुबईत अटक 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

दुबई - लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गायक मिका सिंगला दुबईत अटक करण्यात आली असल्याचे समजते. ब्राझीलमधील 17 वर्षाच्या मुलीच्या तक्रारीनंतर मिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुबई - लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गायक मिका सिंगला दुबईत अटक करण्यात आली असल्याचे समजते. ब्राझीलमधील 17 वर्षाच्या मुलीच्या तक्रारीनंतर मिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिकाने आपल्याला आक्षेपार्ह फोटो पाठवल्याचा आरोप करत या मुलीने मुराक्काबात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी मिकाला पहाटे तीन वाजताच बर दुबई या भागातून अटक केली. सध्या तो आमच्या कोठडीत असल्याची माहिती मिळाली आहे. मिका एका शोसाठी दुबईत गेला होता. त्यावेळी हा प्रकार घडला असून त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे कळते. काही वर्षांपूर्वी वाढदिवसाच्या एका पार्टीत मिकाने बळजबरीने चुंबन घेतल्याचा आरोप अभिनेत्री राखी सावंतने केला होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mika Singh arrested in Dubai

टॅग्स