ऑफीसमधील महिलेशी प्रेम संबंध ठेवल्याने केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी

कार्तिक पुजारी
Wednesday, 22 July 2020

कार्यालयातील महिलेशी अनैतिक संबंध ठेवल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या एका केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी करण्यात आली आहे

वेलिंग्टन- कार्यालयातील महिलेशी अनैतिक संबंध ठेवल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या एका केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या प्रधानमंत्री जेसिंडा अर्डर्न यांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली आहे. इमिग्रेशन मंत्री लीस-गैलोवे यांचे एका महिलेसोबत गेल्या एक वर्षापासून संबंध होते. ही महिला गैलोवे यांच्या अखत्यारित असलेल्या एका एजेंसीमध्ये काम करत होती, अशी माहिती जेसिंडा यांनी दिली आहे.

चीन-अमेरिका वाद शिगेला; ७२ तासात दुतावास बंद करण्याचे आदेश
महिलेला काही काळानंतर मंत्री लीस गैलोवे यांनी आपल्या कार्यालयात नियुक्त करुन घेतलं होतं. गैलोवे (४१) यांनी पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय मान्य केला असून आपली चुकी झाल्याचं म्हटलं आहे. गैलोवे म्हणाले की, ते डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठीही उभे राहणार नाहीत. मला जाणीव आहे की मी पदावर असताना अनुचित प्रकारे काम केलं आहे. त्यामुळे मला मंत्रिपदी राहण्याचा काहीही हक्क नाही.

विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच विरोधी संसद सदस्य एंड्रयू फैलोन यांनी अनेक महिलांना आणि विद्यापीठाच्या विद्यार्थीनींना अश्लील छायाचित्र पाठवल्या प्रकरणी राजीनामा दिला होता. फैलोन यांनी आपल्या कृतीबद्दल माफी मागितली होती. शिवाय ते मानसिक आजारासाठी उपचार घेत आहेत.

लिबरल लेबर पक्षाच्या प्रधानमंत्री जेसिंडा अर्डर्न यांनी सांगितलं की, मंगळवारी उशीरा त्यांना लीस-गैलोव यांच्यावर झालेल्या आरोपांची माहिती मिळाली. त्यानंतर गैलोव यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी दिलेल्या उत्तराने मला कळाले की ते आता मंत्रिपदी राहण्यास लायक नाहीत. त्यांनी केलेल्या कृतीमुळे मला त्यांना मंत्रिपदापासून हटवावे लागले. संसदेत अशा प्रकारचे वागणे यापूर्वी चालले असेल, पण यापुढे अशाप्रकारची कृती सहन केले जाणार नाही.

Good News : कोरोना लशीवर पुढील महिन्यात होणार मानवी चाचणी
आपण सर्वांनी मिळून चांगले वातावरण ठेवणे आवश्यक आहे. मी इथे कोणा एका विशिष्ठ वर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत नाहीये. मात्र, आपल्याला काही संस्कृती इथे पाळावी लागेल, असं जेसिंडा म्हणाल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister fired for improper affair with staffer