मिसिसिपी राज्याला चक्रीवादळानं केलं उद्ध्वस्त; तडाख्यात 26 जणांचा मृत्यू I Weather News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mississippi Tornadoes

चक्रीवादळ आणि वादळामुळं प्रभावित झालेल्या लोकांसाठी अधिक रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवा वाढविण्यात येत आहेत.

Weather News : मिसिसिपी राज्याला चक्रीवादळानं केलं उद्ध्वस्त; तडाख्यात 26 जणांचा मृत्यू

Mississippi Tornadoes : भीषण चक्रीवादळाचा अमेरिकेतील मिसिसिपी राज्याला मोठा फटका बसलाय. वादळात राज्याचं मोठं नुकसान झालंय.

अमेरिकेच्या दक्षिण-पूर्वेकडील मिसिसिपी राज्यात शुक्रवारी आलेल्या भीषण चक्रीवादळामुळं 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या चक्रीवादळाचा सिल्व्हर सिटी, रोलिंग फोर्क या शहरांसह 160 किलोमीटर पेक्षा अधिक क्षेत्राला फटका बसला असल्याचं आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीनं सांगितलंय.

रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, मिसिसिपीमधील 200 लोकसंख्या असलेल्या सिल्व्हर सिटीला चक्रीवादळानं उद्ध्वस्त केलंय. चक्रीवादळातील मृतांची नावं, पत्ते आणि वय अद्याप समजू शकलेले नाहीत.

गव्हर्नर टेट रिव्ह्स यांनी ट्विटरवर सांगितलंय की, चक्रीवादळ आणि वादळामुळं प्रभावित झालेल्या लोकांसाठी अधिक रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवा वाढविण्यात येत आहेत. यासोबतच मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

मिसिसिपी आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सीनं ट्विटरव्दारे सांगितलंय की, 24 मार्चला उशिरा आलेल्या चक्रीवादळामुळं मिसिसिपीमधील रोलिंग फोर्क शहराला तडाखा बसलाय. चक्रीवादळामुळं सुमारे 23 लोकांचा मृत्यू झाला. तर, 12 जण जखमी असून चौघे बेपत्ता आहेत. सध्या मृतांचा आकडा 26 जणांपर्यंत पोहोचला आहे. अजूनही हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :rainamerica