
या मॉडेलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये विजेतेपद पटकावल्यानंतरचे फोटोही आहे. हजारो युर्जंसनी या फोटोला लाईक आणि कमेंट केल्या आहेत.
'मिस बट वर्ल्ड' ने 13 कोटी भरुन उतरविला शरीराच्या विशेष भागाचा विमा!
सहसा लोक त्यांच्या घराचा, कारचा किंवा जीवनाचा विमा उतरवतात. पण ब्राझीलच्या एका मॉडेलने 13 कोटी देऊन तिच्या बटचा (Butt) विमा उतरवला. मॉडेलने विजेतेपद जिंकल्यानंतर तिच्या या भागाचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला. 'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, या ३५ वर्षीय मॉडेलचे नाव नथी किहारा आहे. किहाराने अलीकडेच मिस बट वर्ल्ड 2021 जिंकली आहे. इंस्टाग्रामवरील सर्व स्पर्धकांपैकी तिला सर्वाधिक पसंती (मते) मिळाल्याने किहाराला 'मिस बट वर्ल्ड' म्हणून निवड करण्यात आली.
हे विजेतेपद जिंकल्यानंतर आता ३५ वर्षीय किहाराने आपल्या बटचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला. यासाठी तीने 1.3 मिलियन पौंड (12 कोटी 95 लाख) रुपये खर्च केले आहेत. म्हणजे, किहाराने सुमारे १३ कोटी रुपये देऊन तिच्या एका अवयवाचा विमा उतरवला आहे.
यावेळी ब्राझिलियन मॉडेल म्हणते, "मी माझ्या बटामुळे प्रसिद्ध आहे. मी विजेतेपदही जिंकले आहे. त्यामुळे विमा काढला आहे. किहाराचा दावा आहे की ती अजूनही तिच्या बटच्या आकाराबद्दल समाधानी नाही, ती अधिक व्यायामाद्वारे वाढवण्याचे तिचे ध्येय आहे. नथी किहाराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबाबत अनेक पोस्ट केल्या आहेत. विजेतेपद पटकावल्यानंतर तिने फोटो अपलोड केले आहे. ज्यावर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. इंस्टाग्रामवर किहाराचे 560 हजार फॉलोअर्स आहेत. त्याच्या प्रत्येक पोस्टवर हजारो युजर्स कमेंट्स करत असतात.