माकडांवरील प्रयोगात ‘मॉडर्ना’ला प्राथमिक यश

पीटीआय
Thursday, 30 July 2020

अमेरिकेतील जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आणि कोरोनाविषाणूवरील लसनिर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या मॉडर्ना कंपनीने माकडांवर घेतलेल्या लसीची चाचणी यशस्वी ठरल्याचा दावा केला आहे..

वॉशिंग्टन - अमेरिकेतील जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आणि कोरोनाविषाणूवरील लसनिर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या मॉडर्ना कंपनीने माकडांवर घेतलेल्या लसीची चाचणी यशस्वी ठरल्याचा दावा केला आहे. या कंपनीने अमेरिकेच्या राष्ट्रीय साथरोग संस्थेच्या सहकार्याने एम-आरएनए १२७३ ही लस विकसीत केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

या कंपनीने केलेल्या प्रयोगाची माहिती ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन’मध्ये प्रसिद्ध झाली आहे. शास्त्रज्ञांनी प्रत्येकी आठ माकडांच्या गटावर लशीची प्राथमिक चाचणी घेतली. त्यांनी माकडांना २८ दिवसांच्या अंतराने लशीचे १० किंवा १०० मायक्रोग्रॅमचे दोन डोस दिले. लस दिलेल्या माकडांच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर प्रतिपिंडे तयार झाली. ही प्रतिपिंडे कोरोनाविषाणूला रोखण्याची क्षमता असलेली होती. तसेच, प्रतिपिंडे तयार होण्याचे प्रमाण कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील प्रतिपिंडांहून अधिक असल्याचेही आढळून आले. लशीचे दोन्ही डोस दिल्यानंतर चार आठवड्यांनी या माकडांच्या शरीरात कोरोनाचा विषाणू सोडण्यात आला. दोन दिवसांनंतर त्यांची तपासणी केली असताना कोणत्याही माकडाच्या शरीरात कोरोनाचा विषाणू आढळून आला नाही. याबाबत अधिक प्रयोग सुरु आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modern company succeeds in experimenting with monkeys