
तिआनजिन : ‘‘पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा केवळ भारताच्या आत्म्यावर झालेला हल्ला नव्हता, तर मानवतेवर विश्वास असणाऱ्या सर्व देशांना मिळालेले खुले आव्हान होते. त्यामुळेच अशा वृत्तीचा बीमोड करणे आवश्यक असून दहशतवादाशी लढताना दुटप्पी धोरण राबविणे घातक आहे,’’ असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. शांघाय सहकार्य परिषदेत बोलताना मोदी यांनी, ‘दहशतवादाला काही देशांनी खुला पाठिंबा देणे आपल्याला मान्य आहे का?’ असा सवालही विचारला.