मोदींकडून महातीर यांचे अभिनंदन 

पीटीआय
शुक्रवार, 1 जून 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मलेशियाचे नवे पंतप्रधान महातीर मोहंमद यांची भेट घेऊन विजयाबद्दल अभिनंदन केले. यादरम्यान उभय नेत्यांत दोन्ही देशांतील संबंधांबाबत सकारात्मक चर्चा झाली. 

क्वालांलपूर -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मलेशियाचे नवे पंतप्रधान महातीर मोहंमद यांची भेट घेऊन विजयाबद्दल अभिनंदन केले. यादरम्यान उभय नेत्यांत दोन्ही देशांतील संबंधांबाबत सकारात्मक चर्चा झाली. 

तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी मोदी मलेशियात पोचले. पुत्रजयाच्या पेरदाना पुत्र कॉम्प्लेक्‍स येथील कार्यालयात महातीर यांची भेट घेतली. या वेळी मोदी यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी ट्विट करताना म्हटले की, उभय देशातील परस्पर सहकार्य, व्यापार अधिक मजबूत होण्यासाठी दोन्ही नेत्यांत सकारात्मक चर्चा झाली. पंतप्रधानांनी डॉ. महातीर यांचे मलेशियाचे पंतप्रधान म्हणून निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi congratulates Mahatir