शेतकरी आंदोलनाच्या झळा आंतरराष्ट्रीय पातळीवर; रिहानाच्या ट्विटनंतर मोदी सरकारचं भलं मोठं उत्तर

Farmers_Protest
Farmers_Protest

नवी दिल्ली : दोन महिन्यांपासून देशभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय पॉप आयकॉन रिहाना आणि पर्यावरण क्षेत्रातील प्रसिद्ध कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी आपली भूमिका जाहीर केली. त्यामुळे सोशल मीडियातून त्यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे. याची दखल परराष्ट्र मंत्रालयानेही घेतली आहे. शेतकरी आंदोलनाबद्दल टिप्पणी करण्यापूर्वी याबाबतची संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. 

परराष्ट्र मंत्रालयाचे (एमईए) प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ट्विट करत सविस्तर निवेदन जाहीर केलं आहे. श्रीवास्तव म्हणाले, अशा विषयांवर भाष्य करण्याची घाई करण्यापूर्वी अगोदर वस्तुस्थिती जाणून घ्यायला हवी आणि तसेच या विषयीच्या मुद्द्यांवर व्यक्त होताना त्याबाबतची अधिक समज असणंही आवश्यक आहे. ग्रेटा आणि रिहाना यांनी केलेली वक्तव्य ही बेजबाबदारपणाची आहेत, असं श्रीवास्तव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

ज्या कृषी कायद्यांविरोधात लाखोच्या संख्येत शेतकरी आंदोलन करत आहेत, त्या कायद्यांमुळे कृषी क्षेत्रात सुधारणा घडून येईल. शेतकऱ्यांना फायदा होऊन त्यांची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. 

या नव्या कृषी कायद्यांबाबत खूप कमी शेतकऱ्यांना माहिती आहे, त्यामुळे ते आंदोलन करत आहेत. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावनांचा आम्ही आदर करत असून सरकार शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहे. आतापर्यंत केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये ११ वेळा बैठक झाली असून अजूनही त्यातून तोडगा निघू शकलेला नाही. 

दरम्यान, प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी दर्शवली आहे. काही गट त्यांचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत असून शेतकरी आंदोलन मूळ मुद्यावरून भरकटू नये, यासाठी प्रयत्न केले जावेत, असंही एमईएने निवेदनात म्हटलं आहे.

काय म्हणाली ग्रेटा
स्वीडिश पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ती असलेल्या ग्रेटानं आम्ही भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी एकजुटीने उभे आहोत, असं ट्विट केलं आहे.

रिहानानं केलं होतं पहिलं ट्विट
पॉप सिंगर आणि आयकॉन असलेल्या रिहानानं शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. ती म्हणाली की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी आपण का बोलत नाही आहोत?

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com