कलम 370 हटविल्याने मोदींना पराभव ओढवून घेतला: मसूद अजहर

वृत्तसंस्था
रविवार, 11 ऑगस्ट 2019

कलम 370 हटवल्यानंतर कश्मीरचे विशेष अधिकार संपले. अंबानी, मित्तल, जिंदाल यांच्यासारखे हिंदू भांडवलदार संपूर्ण कश्मीर विकत घेतील आणि उद्योगधंद्यातून अमाप पैसा कमावतील. यामुळे मुस्लिम कश्मीरमधून आपले अस्तित्व गमावून बसतील. परंतु भारताचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही.

इस्लामाबाद : भारताने काश्मीरमधून कलम 370 हटविण्याच्या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत होत असले तरी दहशतवादी मसूद अजहरने यावरून भारताला इशारा दिला आहे. भारताचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असे त्याने म्हटले आहे.

मसूद अजहर म्हणाला, की कलम 370 हटवल्यानंतर कश्मीरचे विशेष अधिकार संपले. अंबानी, मित्तल, जिंदाल यांच्यासारखे हिंदू भांडवलदार संपूर्ण कश्मीर विकत घेतील आणि उद्योगधंद्यातून अमाप पैसा कमावतील. यामुळे मुस्लिम कश्मीरमधून आपले अस्तित्व गमावून बसतील. परंतु भारताचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. या निर्णयामुळे कश्मीरमधील जिहादचा एक अध्याय पूर्ण झाला आहे. कश्मीरबाबबतीत भारताची कुठलीच स्वप्न पूर्ण होणार नाहीत. कलम 370 हटवल्याने मोदींनी आपला पराभव ओढून घेतला आहे. 

दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला आणि त्याच्या दहशतवाद्यांना कलम ३७० हटवल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू काश्मीरला मिळणारे विशेषाधिकार आता संपले आहेत. मोदी सरकारच्या या निर्णयाच सगळीकडून अभिनंदन करण्यात येत आहे. यात अमेरिका, रशिया आणि चीनचाही समावेश आहे. मात्र, पाकिस्तानने निषेध व्यक्त करत भारतासोबतचे सर्व व्यवहार थांबविले आहेत.

  •  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi has accepted defeat his dream will never be fulfilled says Masood Azhar