पंतप्रधान मोदींनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना बॅट दिली; कारण...

पंतप्रधान मोदींनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना बॅट दिली; कारण...

मालदीव: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर पहिला परदेश दौरा मालदीवचा केला. यावेळी त्यांनी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद सोलीह यांना त्यांनी क्रिकेट बॅट भेट दिली. सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. यात सहभागी भारतीय संघातील सर्व खेळाडूंची स्वाक्षरी पंतप्रधान मोदींनी दिलेल्या बॅटवर आहे.

परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी मोदींच्या दौऱ्याआधी सांगितले होते की भारत क्रिकेटमध्ये मालदीवला मदत करू शकतो. त्यात त्यांना स्टेडियम बांधण्यासाठीच्या आर्थिक मदतीचाही समावेश असेल. भारताकडून मालदीवला दिलेल्या प्रस्तावात त्यांच्या देशातील खेळाडूंना भारतात प्रशिक्षण देण्याचाही विचार आहे. याशिवाय इतर स्टाफलाही प्रशिक्षण दिलं जाईल.

बीसीसीआयच्या एका समितीने काही दिवसांपूर्वी मालदीवचा दौरा केला होता. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या मालदीव दौऱ्यावेळी देशातील क्रिकेटला प्रोत्साहन मिळावं अशी विनंती तिथल्या क्रिडा मंत्र्यांकडून करण्यात आली होती. त्यावर, बीसीसीआयकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं मालदीवच्या क्रिडामंत्र्यांनी सांगितलं. आयसीसीनंही मालदीवला 2019 मध्ये असोसिएट मेंबरचा दर्जा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com