
मंकीपॉक्स जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित; WHOची तातडीची बैठक
नवी दिल्ली : जगभरातील मांकीपॉक्सची (Monkeypox) वाढती प्रकरणे पाहता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने डब्ल्यूएचओने सर्वसामान्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी भारतातील केरळमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यादरम्यान केंद्र सरकारकडून सांगण्यात आले की, ज्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे होती ती व्यक्ती काही दिवसांपूर्वी यूएईला जाऊन परतली होती.
या प्रकरणानंतर केरळमध्येच या विषाणूचा दुसरा रुग्ण आढळला होता. केरळमध्ये (Kerala) मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळल्यानंतर केंद्र सरकार पूर्णपणे सतर्क झाले आहे. मंकीपॉक्सचे (Monkeypox) रुग्ण ओळखून वेळीच उपचार करता यावेत यासाठी केंद्राने विमानतळ-बंदरांवर कडक तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचवेळी राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यातील पाचही विमानतळांवर पाळत वाढवली होती.
हेही वाचा: स्मृती इराणींचा काँग्रेसवर पलटवार; माझी मुलगी विद्यार्थिनी आहे, बार चालवत नाही
आतापर्यंत जगातील २७ देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. दुसऱ्या प्रकरणाबाबत केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, ३१ वर्षीय तरुण गेल्या आठवड्यात दुबईहून केरळला आला होता. आजाराची लक्षणे दिल्यानंतर त्याची तपासणी केली असता मंकीपॉक्स झाल्याचे आढळले.
कन्नूरचा रहिवासी असलेल्या तरुणावर परियाराम मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहे. कोल्लम जिल्ह्यातून मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या आठवड्यात राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी केरळमध्ये उच्चस्तरीय पथक पाठवण्यात आले.
पाच विमानतळांवर आरोग्य विभागाची नजर
केरळमध्ये मंकीपॉक्सचे दोन रुग्ण आढळल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने रविवारपासून राज्यातील पाचही विमानतळांवर पाळत ठेवली होती. परदेशातून येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यात येत होती. देशात मंकीपॉक्सची पहिली केस केरळमधील होती. कोल्लम जिल्ह्यातील ३५ वर्षीय पुरुषाला, जो मध्य पूर्वेतील एका देशातून आला होता. त्याची मंकीपॉक्सची चाचणी सकारात्मक आली आणि त्याला तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
Web Title: Monkeypox Declared Global Health Emergency Who
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..