स्मृती इराणींचा काँग्रेसवर पलटवार; माझी मुलगी विद्यार्थिनी आहे, बार चालवत नाही

Smriti Irani Latest Marahi News
Smriti Irani Latest Marahi NewsSmriti Irani Latest Marahi News

नवी दिल्ली : माझी मुलगी १८ वर्षांची आहे. ती राजकारण करीत नाही. महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. ती बार चालवत नाही. काँग्रेसने (Congress) आरटीआयच्या आधारे माझ्या मुलीवर आरोप केले आहे. परंतु, ज्या आरटीआयबद्दल बोलले जात आहे. त्यात माझ्या मुलीचा उल्लेख नाही, असा पलटवार काँग्रेसच्या आरोपांवर स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी केला. (Smriti Irani Latest Marahi News)

काँग्रेसचे (Congress) नेते पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेऊन स्मृती इराणी यांच्यावर गंभीर आरोप केले. आपल्या १८ वर्षांच्या मुलीच्या नावाने बार चालवला जात असल्याचे सांगितले होते. याला उत्तर देताना त्या बोलत होत्या. अमेठीतील पराभव गांधी परिवाराला पचवता आलेला नाही. त्यामुळे असे आरोप करीत आहे. याविरोधात न्यायालयात जाणार आहे, असे स्मृती इराणी (Smriti Irani) म्हणाल्या.

Smriti Irani Latest Marahi News
पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीसांचे स्पष्टीकरण; म्हणाले, वक्तव्याचा...

पंतप्रधानांनी स्मृती इराणी यांचा राजीनामा तातडीने घ्यावा, अशी आमची मागणी आहे. इराणी यांच्यावरील हे आरोप आरटीआयमधून घेतलेली कागदपत्रे नाही. स्मृती इराणी यांच्या मुलीवर (Daughter) गोव्यातील बारमध्ये बनावट परवाना असल्याचा आरोप आहे. हे सर्व बेकायदेशीरपणे घडले, असे काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले होते.

माझ्या मुलीवर खोटे आरोप करणाऱ्या काँग्रेसला कोर्टात जाऊन धडा शिकवेन. माझी मुलगी केवळ १८ वर्षांची असून, महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. ती बार (Bar) चालवत नाही. राजकारणात नाही, असे काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना स्मृती इराणी म्हणाल्या.

Smriti Irani Latest Marahi News
उपमुख्यमंत्र्यांच्या महाविकास आघाडीवर हल्ला; म्हणाले...

राहुल गांधींना सडेतोड उत्तर देऊ

अमेठीच्या खासदार स्मृती इराणी म्हणाल्या की, त्यांचा एकच दोष आहे की त्यांनी अमेठीमध्ये राहुल गांधींचा पराभव केला. राहुल गांधींना आव्हान देताना इराणी म्हणाल्या की, मी २०२४ मध्ये अमेठीतून निवडणूक लढवणार आहे. राहुल गांधींना सडेतोड उत्तर देऊ.

गांधी घराण्याच्या इशाऱ्यावर हल्ला

काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्या मुलीवर जे बिनबुडाचे आरोप केले आहेत ते सर्व गांधी घराण्याच्या इशाऱ्यावर झाले आहेत. माझ्या मुलीचे नाव आरटीआयमध्ये आहे, असे जयराम रमेश म्हणाले. मला त्यांना विचारायचे आहे की त्यांनी माझ्या मुलीचे नाव दाखवावे, असेही स्मृती इराणी म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com