
फ्रान्समध्ये मंकीपॉक्सचा कहर, 1700 रुग्ण आढळले
भारतात मंकीपॉक्सचे 4 रुग्ण आढळून आले असून त्यामुळे सरकार सतर्क झाले आहे.आतापर्यंत देशभरात 15 प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या असून विमानतळांवर देखील चाचण्या घेणे सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, युरोपीय देश फ्रान्समध्ये मंकीपॉक्सचा मोठा कहर पाहायला मिळत आहे. येथे आतापर्यंत एकूण 1,700 प्रकरणे आढळून आली आहेत. फ्रान्सचे आरोग्य मंत्री फ्रान्सिस ब्राउन यांनी याला दुजोरा दिला आहे. (monkeypox Outbreak in france 1700 case reported mostly gay)
मंकीपॉक्सच्या उद्रेकाबद्दल बोलताना ब्राऊन म्हणाले की, देशात मंकीपॉक्ससाठी 100 लसीकरण केंद्रे उघडण्यात आली आहेत. याद्वारे आतापर्यंत 6,000 लोकांना मंकीपॉक्सचा धोका टाळण्यासाठी लसीकरण करण्यात आले आहे. तसेच त्यांनी आवाहन केले आहे की, जर कोणाला मंकीपॉक्सची लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी शक्य तितक्या लवकर स्वत:ला वेगळे करावे.
देशात मंकीपॉक्सचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी मान्य केले, पण घाबरून जाण्याची गरज नसल्याचेही सांगितले. सर्वसामान्यांनी याची काळजी करण्याची गरज नसून लसीकरण कसे वाढवता येईल यावर सरकार भर देत असल्याचे त्यांनी सांगितले. बीएफएम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, आतापर्यंत आढळलेले बहुतेक रुग्ण समलिंगी आहेत आणि त्यांचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध आहेत. पण या लोकांच्या संपर्कात आलेले इतर लोकही मंकीपॉक्सचे बळी ठरू शकतात. म्हणूनच मंकीपॉक्सने ग्रस्त असलेल्यांनी स्वतःला क्वारंटाईन केले पाहिजे, असे ते म्हणाले.
हेही वाचा: मंकीपॉक्सच्या संकटादरम्यान आदर पूनावालांचे लसीबद्दल वक्तव्य, म्हणाले...
फ्रान्समध्ये मंकीपॉक्सचे सर्वाधिक रुग्ण पॅरिस आणि त्याच्या आसपासच्या भागात आहेत. लवकरच पॅरिसमधील लसीकरण केंद्रांची संख्याही वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला हेल्थ इमर्जन्सी धोषित केले आहे आणि ते वेगाने वाढत असल्याचे सांगितले. आतापर्यंत जगातील 75 देशांमध्ये मंकीपॉक्सचे एकूण 16 हजार रुग्ण आढळून आले आहेत. एवढेच नाही तर आफ्रिकेतही या विषाणूने ग्रस्त 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आफ्रिकेबाहेर, मंकीपॉक्सची प्रकरणे सामान्यतः समलैंगिक लोकांमध्ये आढळतात.
हेही वाचा: गद्दारांना तू धडा शिकवणार होय? म्हणत नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंना फटकारलं
Web Title: Monkeypox Outbreak In France 1700 Case Reported Mostly Gay
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..