चार वर्षांत वीस हजार भारतीयांनी मागितला अमेरिकेत आश्रय

वृत्तसंस्था
रविवार, 2 डिसेंबर 2018

2014 नंतर आजतागायत तब्बल 20 हजार भारतीयांनी अमेरिकेत आश्रयाची मागणी केली आहे. चालू वर्षात जुलैपर्यंत जाहीर आकडेवारीनुसार सर्वाधिक 7 हजार 214 भारतीयांनी अमेरिकेत आश्रय मागितला आहे. त्यात केवळ 296 महिलांचा समावेश आहे. अमेरिकेच्या गृह विभाग आणि कॅलिफोर्नियातील उत्तर अमेरिकी पंजाबी सभा (एनएपीए) ने आकडेवारी जाहीर केली आहे.

वॉशिंग्टन: 2014 नंतर आजतागायत तब्बल 20 हजार भारतीयांनी अमेरिकेत आश्रयाची मागणी केली आहे. चालू वर्षात जुलैपर्यंत जाहीर आकडेवारीनुसार सर्वाधिक 7 हजार 214 भारतीयांनी अमेरिकेत आश्रय मागितला आहे. त्यात केवळ 296 महिलांचा समावेश आहे. अमेरिकेच्या गृह विभाग आणि कॅलिफोर्नियातील उत्तर अमेरिकी पंजाबी सभा (एनएपीए) ने आकडेवारी जाहीर केली आहे.

संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 2014 मध्ये 2306 भारतीयांनी अमेरिकेत आश्रयासाठी अर्ज केला होता. त्यात 146 महिलांचा समावेश आहे. यापैकी एका अर्जाची माहिती अद्याप समजू शकली नाही. 2015 मध्ये 2971 नागरिकांनी आश्रय मागितला आणि त्यात 96 महिला होत्या. 2016 रोजी ही संख्या 4 हजार 88 वर पोचली, आणि महिलांची संख्या 123 होती. यानुसार 2017 मध्ये 3656 जणांनी अमेरिकेत राहण्यासाठी अर्ज केला आणि त्यात 187 महिला होत्या. पंजाबी सभेचे संचालक सतनामसिंग चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत आश्रय मागणाऱ्या भारतीयांची संख्या गेल्या दोन वर्षांत सुमारे दुप्पट झाली आहे.

हजारो नागरिक अमेरिकेत आपले नशीब अजमावण्यासाठी येतात आणि त्यातील बहुतांश नागरिक पंजाबचे आहेत. परदेशात येण्यासाठी ही मंडळी 25 ते 30 लाख रुपये ट्रॅव्हल एजंटला देत असल्याचेही चहल म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More Than 20,000 Indians Have Sought Political Asylum In US Since 2014