
उत्तर कोरियात 8 लाख जणांना संसर्ग, तर 50 मृत्यू, कोरोनाचा उद्रेक
उत्तर कोरियामध्ये एप्रिलअखेर सुरु झालेल्या ओमायक्रॉनचा संसर्ग झपाट्याने वाढतोय आत्तापर्यंत 8 लाख कोरोना जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालीय. तर ५ लाख ६४ हजार जणांना क्वारंन्टाईन करण्यात आलंय. (North korea reported 50 death till now)
मागील २४ तासांमध्ये उत्तर कोरियात ८ जणांचा मृत्यू झालाय, तर आत्तापर्यंत ५० जणांचा मृत्यू झालाय. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी आर्मीला पाचारण केलंय. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये देखील आर्मी औपधं पोहोचवणं आणि इतर व्यवस्थापनासाठी राजधानीत तैनात करण्यात आलंय. उशिराने औषध पुरवठा होत असल्याने किम जोंग उन संतापल्याचं उत्तर कोरियन वृत्तसंस्थांनी म्हंटलय.
उत्तर कोरियात कोरोना वाढत असताना तिथे ज्यांना ताप येतोय, अशा नागरिकांची टेस्ट करण्यासाठी देखील किट उपलब्ध नाही. तसंच ज्यांना ताप येतोय अशा नागरिकांना क्वारंटाईन करण्यावरच भर दिलाय जातोय. उत्तर कोरियात वैद्यकीय सुविधांचा दर्जा अतिशय निकृष्ठ असल्याने देखील कोरोनाच्या टेस्ट घेणं आणि औषधोपचार यात मोठ्या प्रमाणात अडचणी येतायत.
उत्तर कोरियात लसीकरण आणि कोरोना टेस्टींग किटची देखील कमकरता आहे. अशातच दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने, उत्तर कोरिया क्षेपणास्त्रांची चाचणी करणार असल्याचा दावा केलाय
Web Title: More Than 5 Lakh Corona Cases Reported In North Korea 50 Died
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..