आतापर्यंत लाखो जणांचे स्थलांतर; गाझा पट्टीतून पलायन सुरुच, अन्न-पाण्याविना हाल

अन्न-पाण्याच्या कमतरतेमुळे या नागरिकांचे अत्यंत हाल होत असल्याचे स्वयंसेवी संघटनांनी सांगितले.
more than million people in Gaza forced to flee their homes since Israel began its offensive
more than million people in Gaza forced to flee their homes since Israel began its offensivesakal

खान युनिस (गाझा पट्टी) : इस्राईलने हल्ले सुरु केल्यापासून गाझा पट्टीतील दहा लाखांहून अधिक जणांना आपले घर सोडून निघून जावे लागले आहे. इस्राईलच्या लष्कराकडून जमिनमार्गे हल्ला होण्याची टांगती तलवार कायम असल्याने सामान्य नागरिकांचे स्थलांतर अद्यापही सुरुच आहे. अन्न-पाण्याच्या कमतरतेमुळे या नागरिकांचे अत्यंत हाल होत असल्याचे स्वयंसेवी संघटनांनी सांगितले.

इस्राईलने उत्तर गाझामधील लोकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक घर सोडून निघून जात आहेत. आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांनी स्थलांतर केले आहे. त्यापैकी किमान पाच लाख नागरिक संयुक्त राष्ट्रांनी उभारलेल्या शाळांमध्ये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी आश्रयाला आहेत.

इस्राईलने गाझा पट्टीचा वीज, पाणी आणि इंधन यांचा पुरवठा थांबविला असून युद्धामुळे अन्नाचाही तुटवडा आहे. त्यामुळे स्थलांतरितांना पाण्याची आणि अन्नाची प्रचंड कमतरता भासत आहे. संयुक्त राष्ट्रांकडून मदत पुरविण्याचा प्रयत्न सुरु असला तरी इस्राईलच्या सततच्या हवाई हल्ल्यांमुळे सर्व जणांपर्यंत मदत पोहोचविणे अवघड असल्याचे स्वयंसेवी संघटनांनी सांगितले.

हल्ल्याची टांगती तलवार

इस्राईलने केलेल्या हल्ल्यांमध्ये गाझा पट्टीतील २,६७० नागरिकांचा मृत्यू झाला असून ९,६०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. इस्राईलकडून उत्तर गाझामध्ये हवाई हल्ले सुरुच असून त्यांनी हमासशी संबंधित अनेक ठिकाणांना लक्ष्य केले आहे. गाझा पट्टीच्या सीमेवर इस्राईलने आपले सैन्य सज्ज ठेवले असले तरी हल्ला कधी करणार, ते जाहीर केलेले नाही. या हल्ल्यामुळे मृतांची संख्या अनेक पटींनी वाढेल, असा इशारा मानवतावादी संघटनांनी दिला आहे. या संघर्षात इस्राईलचेही १,४०० जण मारले गेले आहेत.

आम्हीच कोलमडण्याच्या स्थितीत : यूएन

जेरुसलेम : पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांचे गाझा पट्टीतही कार्यालय आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून मोठे मदतकार्य चालते. मात्र, इस्राईल-हमास यांच्यातील संघर्ष वाढत चालला असल्याने त्यांच्याकडेही बचावसाहित्याची कमतरता भासत असून ‘आम्हीही कोलमडण्याच्या स्थितीत आहोत’ असे त्यांनी म्हटले आहे. गाझा पट्टीत काम करणाऱ्या ‘यूएन’ला शव झाकून ठेवणाऱ्या बॉडीबॅगचाही तुटवडा भासत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com