Morocco Earthquake : प्रायोरिटीज सॉर्टेड! भूकंप आला अन् हातात केवळ व्हिडिओ गेम घेत बाहेर पळाला तरुण, फोटो होतोय व्हायरल

PlayStation 5 : सोनीचा हा सर्वात लोकप्रिय गेमिंग कन्सोल आहे.
Morocco Earthquake PlayStation 5
Morocco Earthquake PlayStation 5eSakal
Updated on

मोरक्कोमध्ये 6.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामध्ये तब्बल दोन हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला असून, शेकडो जखमी झाले आहेत. यानंतर मोरक्कोमधील कित्येक भीषण व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहेत. मात्र, या सगळ्यात एक फोटो नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.

साधारणपणे भूकंप किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर लोक मौल्यवान किंवा गरजेच्या वस्तू घेऊन घराबाहेर पडतात. मात्र मोरक्कोमध्ये भूकंप आल्यानंतर एक व्यक्ती चक्क आपला प्लेस्टेशन-5 हा गेमिंग कन्सोल घेऊन घराबाहेर पडला. त्याचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

विशेष म्हणजे, भूकंपाचे धक्के जाणवताच या तरुणाने अंगावर जेवढे कपडे होते त्यावरच बाहेर धाव घेतली. मात्र, यात तो आपलं PlayStation 5 घेणं विसरला नाही. नेटिझन्स यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींना हा मूर्खपणा वाटतो आहे, तर काही नेटकरी त्याला हार्डकोअर गेमर म्हणत आहेत.

प्लेस्टेशन 5

सोनी या व्हिडिओ गेम बनवणाऱ्या कंपनीचं PlayStation 5 हे लेटेस्ट कन्सोल आहे. आतापर्यंतचं सर्वात महाग आणि सर्वात हायटेक असं हे गेमिंग कन्सोल जगभरात लोकप्रिय आहे. PS5 कन्सोलचे आतापर्यंत चार कोटींहून अधिक युनिट्स विकले गेले आहेत.

Morocco Earthquake PlayStation 5
Morocco Earthquake: मोरक्कोला भूकंपाचा तडाखा! बळींची संख्या 2000 पार; एक हजारांहून अधिक गंभीर जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com