मॉस्को : चित्रीकरणासाठी अवकाशात उड्डाण

रशियाच्या एका अभिनेत्रीने आणि चित्रपट दिग्दर्शकाने आज अवकाशात उड्डाण केले.
चित्रीकरणासाठी अवकाशात उड्डाण
चित्रीकरणासाठी अवकाशात उड्डाणsakal

मॉस्को : अवकाशात चित्रीकरण झालेला जगातील पहिला चित्रपट असा मान प्राप्त करण्यासाठी रशियाच्या एका अभिनेत्रीने आणि चित्रपट दिग्दर्शकाने आज अवकाशात उड्डाण केले.

कझाकस्तानमधील रशियाच्या अवकाश केंद्रावरून सोयूझ एमएस-१९ या प्रक्षेपकाच्या मदतीने हे दोघे जण आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राकडे रवाना झाले आहेत.

अवकाशयानात अभिनेत्री युलिया पेरेसिल्द आणि दिग्दर्शक क्लिम शिपेन्को यांच्याबरोबर एक अवकाशवीर आहे. ‘चॅलेंज’ या नावाच्या चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात ते चित्रीकरण करणार आहेत. युलिया ही एका डॉक्टरची भूमिका करत असून ह्रदयविकाराचा झटका आलेल्या एका अवकाशवीराला वाचविण्यासाठी ती अवकाशस्थानकात जाते, असा चित्रीकरणाचा विषय आहे.

चित्रीकरणासाठी अवकाशात उड्डाण
हॅकरकडून मुलांचे ऑनलाइन शोषण; सायबर गुन्हेगारांचे नवे टार्गेट

बारा दिवस चित्रीकरण

बारा दिवस हे चित्रीकरण चालणार असून त्यानंतर युलिया आणि क्लिम पृथ्वीवर परततील. या अवकाश उड्डाणासाठी दोघांनीही प्रशिक्षण घेतले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com