Moscow Attack: इस्लामिक स्टेटचा हल्ला पुतिन घेणार बदला! मॉस्को हल्ल्याबाबत आतापर्यंत काय माहिती आहे?

Moscow concert hall attack: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या हल्ल्याबाबत अद्याप काही भाष्य केलेलं नाही. या हल्ल्यासंदर्भात आतापर्यंत आपल्याला काय काय माहिती आहे, हे जाणून घेऊया.
Moscow concert hall attack
Moscow concert hall attackESAKAL

मॉस्को- रशियाच्या मॉस्कोमध्ये भीषण हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाच हल्लेखोरांनी एका कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांवर अंदाधूंद गोळीबार केला आहे. एएनआयच्या माहितीनुसार, आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झालाय. पण, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या हल्ल्याबाबत अद्याप काही भाष्य केलेलं नाही. या हल्ल्यासंदर्भात आतापर्यंत आपल्याला काय काय माहिती आहे, हे जाणून घेऊया. (Moscow concert hall attack what we know so far President Vladimir Putin warning)

Moscow concert hall attack
मोठी बातमी! रशियाच्या राजधानीत दहशतवादी हल्ला; 70 ठार, 60 जणांची प्रकृती गंभीर; 115 जणांना रुग्णालयात केलं दाखल

मॉस्कोतील हल्ल्याबाबत आपल्याला काय माहिती आहे?

1. मॉस्कोच्या जवळ असलेल्या क्रासनोगोर्स्कमध्ये (Krasnogorsk) क्रोकस सिटी हॉलमध्ये रशियन रॉक ग्रुप पिकनिकचा (Piknik) कार्यक्रम होणार होता. हॉलमध्ये ६,२०० लोकांना बसण्याची व्यवस्था होती. शिवाय कार्यक्रम हाऊसफूल होता. लोक आपल्या जागी बसत असताना हा हल्ला झाला.

2. अधिकृत आकडेवारीनुसार, आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झालाय. तर १४५ पेक्षा अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ६० जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मॉस्कोचे महापौर अँड्रे वोवोब्योय यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

3. जवळपास पाच जण या हल्ल्यासाठी कारणीभूत होते. इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. संघटनेने टेलिग्रामवर पोस्ट करुन याची माहिती दिली आहे. पाचही हल्लेखोर फरार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात व्हायरल व्हिडिओमध्ये दोन हल्लेखोर हॉलमध्ये असल्याचं दिसत आहे.

4. रशियाच्या सूरक्षा एजेन्सीनुसार, हल्लोखोरांचा शोध घेतला जात आहे. एजेन्सीने यासंदर्भात अधिक भाष्य करण्यास नकार दिला आहे.

5. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक हल्लेखोर ऑटोमॅटिक शस्त्रातून रशियन लोकांवर अंदाधूद गोळीबार करत आहे. लोक सैरावैरा पळत आहेत. लोकांनी एमरजेन्सी एक्झिटकडे धाव घेतली. यावेळी चेंगराचेंगरी झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

Moscow concert hall attack
Vladimir Putin: तिसरं महायुद्ध होणार? पुतिन यांच्या सत्तेत येण्यामुळे जगावर होणारे 3 परिणाम!

५. एका स्थानिक पत्रकाराने सांगितलं की, हल्लेखोरांनी ग्रॅनेड बॉम्ब देखील फोडला आहे. त्यानंतर बिल्डिंगला आग लागली. तीन हेलिकॉप्टर आग विझवण्याचे काम करत होते. हॉलच्या बेसमेंटमधून १०० लोकांना अग्निशमन दलाच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले आहे. माहितीनुसार, पिकनिक ग्रुप सुखरुप आहे. छतावर अडकलेल्या काही जणांना वाचवण्याचे काम सुरु होते.

6. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची नुकतीच अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. त्यानंतर दोनच दिवसात हा हल्ला झाला आहे. सुरक्षा यंत्रणांनी सांगितलं की, हल्ल्याची प्रत्येक अपडेट पुतिन यांना दिली जात आहे. पुतिन यांनी या हल्ल्याबाबत काही भाष्य केलं नाही. पण, पुतिन याबाबत बदला घेतील हे निश्चित आहे. यात युक्रेनचा काही हात आहे का? हेही रशियाकडून पाहिलं जात आहे. युक्रेनच्या नेत्यांचा हात आढळल्यास युद्धाचा मोठा भडका उडण्याची शक्यता आहे.

7. महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेसह पश्चिमी देशांनी एक धोक्याची सूचना जारी केली होती. त्यानुसार रशियातील आपल्या नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी न जमण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दहशतवादी हल्ल्याची शक्यता या देशांनी व्यक्त केली होती. रशियाने देशात सुरक्षा वाढवली आहे. एअरपोर्टवर चौख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com