esakal | जगातील 8 असे देश ज्यांच्या सीमा आहेत अभेद्य!
sakal

बोलून बातमी शोधा

border_security.jpg

जेव्हा देशांच्या सीमा सामाईक असतात, तेव्हा हे शत्रूत्व अधिकच वाढतं.

जगातील 8 असे देश ज्यांच्या सीमा आहेत अभेद्य!

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

जगभरातील अनेक देशांमध्ये शत्रूत्व आहे. मात्र, जेव्हा देशांच्या सीमा सामाईक असतात, तेव्हा हे शत्रूत्व अधिकच वाढतं. जगातील असे कोणते देश आहेत, ज्यांच्या सीमा सर्वाधिक संरक्षित आहेत, हे आपण पाहुया...

मॅक्सिको-अमेरिका

उत्तर अमेरिकेतील या दोन देशांमधील सीमा काही शहरे आणि दाट जंगलला लागून आहे. आतापर्यंत जवळजवळ ५ लाख लोकांनी ही सीमा बेकायदेशीररित्या पार करण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगितलं जातं. या प्रयत्नात अनेकांनी आपला जीवही गमावला आहे. 

भारत-पाकिस्तान

जगात केवळ या दोन देशांची सीमा अशी आहे, जी अवकाशातूही पाहिली जाऊ शकते. भारत-पाकिस्तान सीमा बेकायदेशीररित्या पार करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण दिल्यासारखं ठरु शकते. कारण दोन्ही देशांनी सीमेवर मोठा फौजफाटा तैनात केला आहे. दोन्ही देशांचे सैनिक बेकायदेशीर सीमा पार करणाऱ्याला गोळ्या घालण्याआधी एकदाही विचार करणार नाहीत. 

दक्षिण आणि उत्तर कोरिया

दक्षिण आणि उत्तर कोरियाच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सैनिकांची तैनाती करण्यात आली आहे. उभय देशांच्या सीमा काटेरी तारांनी वेढण्यात आली आहे. शिवाय सीमा भागात लँड माईन्स पसरवण्यात आल्या आहेत. या दोन्ही देशांमधून विस्तवही जात नाही. शिवाय हे दोन्ही देश एकमेकांशी फारशी चर्चाही करत नाहीत. 

इस्त्राईल- सीरिया

उभय देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहे. शिवाय अनेक मुद्द्यांवरुन त्यांच्यात तणावाची स्थिती आहे. गोलन हाईटच्या भागावरुन या दोन्ही देशांमधील स्थिती स्फोटक आहे. दोन्ही देशांनी या भागात आपले सैनित तैनात केले आहेत. तसेच इस्त्राईल आणि सीरियाचे सैनिक या भागात गस्त घालत असतात. 

भारत-बांगलादेश

जगातील सर्वाधिक लांबीची सीमा या दोन देशांमध्ये आहे. उभय देशांमध्ये ४१५६ किलोमीटरची सीमा आहे. दोन्ही देशांची सीमा कुंपनांनी वेढलेली आहे. शिवाय बेकायदेशीररित्या सीमा पार करता येत नाही. जर तुम्ही असा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला लष्कराच्या कारवाईचा सामना करावा लागेल. 

चीन-उत्तर कोरिया

दोन्ही देशांची सीमा दोन नद्यांमुळे विभागली गेली आहे. उभय देशांनी घुसखोरी रोखण्यासाठी सर्व प्रकारची तयारी केली आहे. असे असले तरी लोकांनी दुसऱ्या देशात पलायन केल्याच्या बातम्या ऐकायला येत असतात. 

पाकिस्तान-अफगाणिस्तान

पाकिस्तान आपल्या सीमेवर कुंपन तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण, अफगाणिस्तानमधून अनेक लोक पाकिस्तानमध्ये घुसखोरी करत असतात. दोन्ही देशांच्या सरकारचे आपल्या सीमा-भागावर फारशे नियंत्रण नाही. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये सीमा भागातून अवैध धंदा सुरु असल्याचं पाहिला मिळतं. 

भारत-चीन

दोन्ही देशांमध्ये ३४८८ किलोमीटर लांबीची सीमा आहे. या दोन्ही देशांमध्ये सीमेवर गेल्या ४५ वर्षांपासून एकही गोळी चालली नाही. मात्र, सध्या उभय देशामध्ये तणावाचे वातावरण आहे. शिवाय दोन्ही देशांमध्ये अनेक भागावरुन वाद आहेत. ज्यावर दोन्ही देश आपला दावा सांगत असतात. त्यामुळे अनेकदा या देशांमध्ये स्थिती गंभीर झाल्याचं पाहिला मिळालं आहे.