esakal | 40 वर्षांत 27 वेळा गरोदर; तब्बल 69 मुलांना जन्म देणाऱ्या आईची 'गिनीज'मध्ये नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

Valentina Vassilyev

आपल्या आयुष्यात स्त्री किती वेळा गर्भवती होऊ शकते? 5-10-15? आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल, की एक स्त्री आपल्या आयुष्यात 27 वेळा गरोदर राहिली आणि एकूण 69 मुलांना जन्म दिला.

40 वर्षांत 27 वेळा गरोदर; तब्बल 69 मुलांना जन्म देणाऱ्या आईची 'गिनीज'मध्ये नोंद

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : आपल्या आयुष्यात स्त्री किती वेळा गर्भवती होऊ शकते? 5-10-15? आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल, की एक स्त्री आपल्या आयुष्यात 27 वेळा गरोदर राहिली आणि एकूण 69 मुलांना जन्म दिला. होय, आपण खरं ऐकलं! काही दिवसांपूर्वी पश्चिम आफ्रिकेतील (West Africa) 25 वर्षीय हलिमा सिझ (Halima Cisse) हिने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिल्याने ती चर्चेत आलीय. एकाचवेळी सर्वाधिक मुलांना जन्म देण्याचा विक्रम तिच्या नावावर नोंदवण्यात आलाय. मात्र, अठराव्या शतकातील आणखी एक महिला चर्चेत आहे. या महिलेनं 40 वर्षांच्या काळात तब्बल 69 मुलांना जन्म दिला होता. सर्वाधिक मुले असण्याचा विक्रम या महिलेच्या नावावर नोंदला गेला आहे. याची दखल गिनीज बुकमध्येही नोंदवण्यात आलीय. (Most Prolific Mother Her Name Was Valentina Vassilyev And She Gave Birth To 69 Childrens)

ही आश्चर्यकारक घटना 18 व्या शतकात घडली असून रशियातील (Russia) वेलेंतीना वासिल्येव (Valentina Vassilyev) असे या महिलेचं नाव आहे. या महिलेनं 16 वेळा जुळ्या मुलांना जन्म दिला. सात वेळा तिळ्यांना, तर चार वेळा चार-चार मुलांना जन्म दिला. ती एकूण 27 वेळा गरोदर राहिली आणि 69 मुलांना जन्म दिला. वेलेंतीनाने जन्म दिलेल्यांपैकी एका जुळ्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, तिची 67 मुलं ठणठणीत आणि सुदृढ होती. दरम्यान, 40 वर्षांत तिने एवढ्या मुलांना जन्म दिल्यामुळे तिच्या नावार विक्रमाची नोंद झाली आहे. त्या काळात वैद्यकीय विज्ञान फारसे प्रगत नव्हते. तसेच औषध व डाॅक्टरांचा देखील अभाव होता. मात्र, तरी देखील 27 वेळा गरोदर राहून 69 मुलांना जन्म देणे, हा चमत्कारच म्हणावा लागेल, अशी प्रतिक्रिया काहींनी दिलीय.

हेही वाचा: ऐकावं ते नवलंच! महिलेने दिला 10 मुलांना एकत्र जन्म!

Baby

Baby

फ्योडोर वासिल्येव या शेतकऱ्यासोबत (Farmer) वेलेंतीना वासिल्येवचं लग्न झालं होतं. फ्योडोर हा शेतीसोबतच घोडा गाड्यांची चाकं बसवणे, घोड्यांच्या पायाला नाल मारणे अशीही कामं करायचा. त्याची दोन लग्न झाली होती. त्याच्या दुसऱ्या पत्नीला 18 मुलं होती. दुसऱ्या पत्नीनं सहा वेळा जुळ्या मुलांना जन्म दिला आणि दोन वेळा तिळ्यांना जन्म दिला. त्यामुळे फ्योडोरला एकूण 87 मुले झाली. त्यातली एक मुलं सोडता 85 मुलं ठणठणीत बरी होती. त्यामुळे त्यांची नावे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आली आहेत. या घटनेची फारसी कल्पना काहींना नसली, तरी ही घटना 18 व्या शतकातील महत्वपूर्ण घटना समजली जाते. कारण, त्याकाळात ना डाॅक्टर लवकर मिळाचे, ना वैद्यकीय सुविधा.. अशा परिस्थितीत तब्बल 87 मुलांना जन्म देणं आणि स्वत: सोबत मुलांना सुरक्षित ठेवणे ही साधी गोष्ट नव्हती.

Most Prolific Mother Her Name Was Valentina Vassilyev And She Gave Birth To 69 Childrens