esakal | कोरोनाचा आणखी एक धोकादायक व्हेरिएंट, लसही ठरते निष्प्रभ - WHO
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोनाचा आणखी एक धोकादायक व्हेरिएंट, लसही ठरते निष्प्रभ - WHO

sakal_logo
By
सुधीर काकडे

कोरोना (Covid19) पुन्हा वर डोक काढताना दिसत असतानाच आता कोरोनाचा एक नवा व्हेरिएंट समोर आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुद्धा या नव्या व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. Mu नामक नव्या व्हॅंरिएंटवर आमचे शास्त्रज्ञ लक्ष ठेवून असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. वैज्ञानिकांमध्ये या नव्या व्हेरिएंटला B.1.621 म्हणून संबोधले जाते. चिंतेची बाब म्हणजे या नव्या व्हेरिएंटवर कोरोनाच्या लसीचा सुद्धा फारसा प्रभाव होत नसल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. कोरोना व्हेरिएंटचे हे म्युटेशन असून, या व्हेरिएंटसमोर कोरोना लसी सुद्धा कमकूवत ठरतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान या व्हेरिएंटबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अभ्यास सुरु असल्याचे देखील WHOने आपल्या बुलेटीनमध्ये सांगितले आहे. तसेच Mu व्हेरिएंट (mu variant) हा म्यूटेशनचा एक कॉन्स्टेलेशन आहे, जो व्हॅक्सिनपासून स्वत:ला सहज वाचवू शकतो.

हेही वाचा: कोरोनाच्या उत्पत्तीचे कारण गुलदस्तात; शोध घेण्यास अमेरिकेला अपयश

कोरोनाचा हा नवा म्युटेशन समोर आल्यापासून जागतिक स्तरावर या मुद्यावर चिंता व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जागतिक पातळीवर कोरोनाचा प्रसार होऊ शकतो अशी भीती निर्माण झाली आहे. कोरोनाची लस न घेतलेल्या लोकांमध्ये तसेच सुरक्षिततेच्या उपायांचे पालन केले जात नाही अशा भागांसाठी हा म्यूटेशन जास्त धोकादायक ठरु शकतो.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संक्रमणाचे कारण असलेल्या SARS-CoV-2 सह सर्वच व्हायरसचे म्युटेशन होते. गार्डीयनने दिलेल्या वृत्तानुसार WHO च्या अभ्यासात सध्या कोरोनाचे चार व्हेरिएंट समोर आले आहेत. या व्हेरिएंटमध्ये अल्फा व्हेरिएंटचा सुद्धा समावेश आहे. विशेष म्हणजे जगातील १९३ देशांत हा व्हेरिएंट आढळून आला आहे. तर डेल्टा व्हेरिएंट १७० देशांत आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संघटना ज्या व्हेरिअंटवर संशोधन, अभ्यास करत आहे त्यात आता Mu ची भर पडली असून हा पाचवा व्हेरिअंट आहे. कोलोंबिया आणि दक्षिण अमेरिकेतील काही ठीकाणी हा व्हेरिएंट आढळून आला आहे.

loading image
go to top