esakal | मुल्लाह बरादर असणार तालिबान सरकारचा प्रमुख
sakal

बोलून बातमी शोधा

mullah baradar

मुल्लाह बरादर असणार तालिबान सरकारचा प्रमुख

sakal_logo
By
सुधीर काकडे

अफगाणिस्तनमध्ये (Afghanistan) सध्या तालिबानकडून (Taliban) सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. आज तालिबान या संबंधीतचे महत्वाचे निर्णय घेणार आहे. तालिबानचा सहसंस्थापक मुल्लाह बरादर हा तालिबान सरकारचा प्रमुख असणार हा निर्णय तालिबानने घेतला आहे. मागच्या काही दिवसांपासुन मुल्लाह घनी बरादर हाच तालिबान सरकारचा प्रमुख असणार अशी चर्चा सुरु होती. तालिबानने हा निर्णय घेतला असून लवकरच यासंबंधीतची अधिकृत घोषणा तालिबान करणार असे रॉयटर्सच्या वृत्तामधून समोर आले आहे.

अमेरिकेने (US) २० वर्षांनंतर अफगाणिस्तामधील (Afghanistan) आपले सैन्य मागे घेतले आणि ३१ ऑगस्टला अमेरिकेच्या शेवटच्या सैनिकाने अफगाणिस्तान सोडले. यावेळी तालिबानने (Taliban) मोठा जल्लोष साजरा केला. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला असून पंजशीर वगळता संपुर्ण देशावर तालिबानचे आज वर्चस्व आहे. अमेरिकेने देश सोडल्यानंतर आता तालिबानकडून सत्तास्थापनेच्या हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. त्यातच आज तालिबान सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: तालिबानचा प्रमुख नेता 'हिबतुल्लाह अखुंदजादा' कोण आहे? जाणून घ्या

अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानमधील एक एक शहर ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि १५ ऑगस्ट रोजी राजधीनी काबूलवर तालिबानचा ध्वज फडकावला. या दरम्यान काबूलमधील हमीद करझई विमानतळावरू वेगवेगळ्या देशातील तब्बल १ लाख २२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी देश सोडला. अमेरिकेने देखील दुतावासातील कर्मचारी आणि सैन्याला अफगाणिस्तानच्या बाहेर काढले. आज शुक्रवारच्या प्रार्थनेच्या वेळी तालिबान आपले सरकार स्थापन करण्याशी संबंधीत निर्णय घेऊ शकते.

loading image
go to top