26/11च्या म्होरक्यांना पकडून देणाऱ्यांना अमेरिका देणार बक्षीस

वृत्तसंस्था
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो म्हणाले, की 26/11 हल्ल्याशी संबंधितांना अटक करण्यास मदत करण्यास बक्षीस दिले जाईल. या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना अद्याप अटक न होणे, हे आपल्यासाठी अपमानास्पद आहे. पाकिस्तानची जबाबदारी आहे, की त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात प्रस्ताव मांडून दोषींना शिक्षा दिली पाहिजे.

वॉशिंग्टन : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्या म्होरक्यांना पकडून देणाऱ्यांना अमेरिकेकडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
पाकिस्तानपर्यंत धागेदोरे जाणारा 26/11 प्रमाणेच आणखी एखादा दहशतवादी हल्ला भारतावर झाल्यास युद्ध होण्याची दाट शक्‍यता असल्याचे अमेरिकेमधील तज्ज्ञांनी म्हटले आहे. मुंबईवर 26/11 ला झालेल्या हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. तसेच अमेरिकेने या हल्ल्याचे म्होरके हाफिज सईद, झकीउर रेहमना लख्वी यांना पकडून देणाऱ्याला 50 लाख डॉलर (35 कोटी रुपये) बक्षीस जाहीर केले आहे. 

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो म्हणाले, की 26/11 हल्ल्याशी संबंधितांना अटक करण्यास मदत करण्यास बक्षीस दिले जाईल. या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना अद्याप अटक न होणे, हे आपल्यासाठी अपमानास्पद आहे. पाकिस्तानची जबाबदारी आहे, की त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात प्रस्ताव मांडून दोषींना शिक्षा दिली पाहिजे.

या दहशतवादी हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद हा अद्यापही पाकिस्तानमध्ये मुक्तपणे फिरत असल्याने दहशतवाद्यांना शासन करण्याबाबत पाकिस्तान सरकार गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे. हल्ल्याच्या घटनेला दहा वर्षे पूर्ण होत आली, तरी या प्रकरणातील सातही संशयितांवर पाकिस्तानने कारवाई केलेली नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai 26/11 America announces 5 million dollar reward for info on attack will press Pakistan