Video: चिमुकल्याने काय केलीय बॅटींग!

वृत्तसंस्था
Monday, 5 October 2020

सध्या आयपीएल सुरू असल्यामुळे क्रिकेटप्रेमी खेळ पाहण्याचा आनंद लुटत आहेत. रस्त्यांवरही लहान मुले क्रिकेट खेळताना दिसतात. असाच एका लहान चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नवी दिल्लीः सध्या आयपीएल सुरू असल्यामुळे क्रिकेटप्रेमी खेळ पाहण्याचा आनंद लुटत आहेत. रस्त्यांवरही लहान मुले क्रिकेट खेळताना दिसतात. असाच एका लहान चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Video: युवती अडकली वॉशिंग मशिनमध्ये...

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका चिमुकल्याने अनुवानी पायाने एखाद्या अनुभवी क्रिकेटपटूप्रमाणे बॅटिंग केली आहे. भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू आकाश चोपडा याने हा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला त्याने शीर्षक देताना म्हटले आहे की, 'जर तुम्हाला उडायचे असेल तर पायांमध्ये चपला नाही तर विचारांमध्ये पंख असावे लागतात.' दरम्यान, लाखो नेटिझन्सनी हा व्हिडिओ पाहिला असून, प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. प्रतिक्रियांमध्ये छोटा सचिन तेंडूलकर असल्याचेही म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no shoes no problem aakash chopra share video child playinig cricket