पॅरिसमध्ये चाकूहल्ल्यात आई, बहीण ठार 

पीटीआय
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पॅरिस (पीटीआय) : पॅरिस, ता. 23 (पीटीआय): हल्लेखोर मुलाने आईचा आणि बहिणीचा चाकूने खून केल्याची खळबळजनक घटना पॅरिसजवळ ट्रॅप्स येथे गुरुवारी सकाळी घडली. या हल्ल्यात आणखी एक जखमी झाला असून या वेळी झालेल्या कारवाईत पोलिसांनी हल्लेखोराला ठार केले. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिस 2016 पासून त्याच्यावर पाळत ठेऊन होते. या हल्ल्यामागचे कारण समजू शकले नाही, मात्र इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 

पॅरिस शहरापासून तीस किलोमीटर अंतरावरील ट्रेप्स येथे गुरुवारी सकाळी एकाने आई आणि बहिणीवर चाकूने हल्ला केला. त्यात दोघीही ठार झाल्या. या हल्ल्यादरम्यान आणखी एक जण जखमी झाला. हल्ल्यानंतर तो इमारतीच्या पाठीमागे लपण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचवेळी पोलिसांनी त्याला घेरले आणि ठार केले. हल्ल्यामागचा उद्देश अद्याप स्पष्ट होऊ शकला नाही. हल्लेखोराचे नाव समजू शकले नाही. दरम्यान, याचवर्षी मे महिन्यात पॅरिसमध्ये एका संशयित दहशतवाद्याने चाकूने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता आणि चार जण जखमी झाले होते. त्यानंतर या हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder of mother and sister in paris