‘फ्रेंच येत नाही, कुणी ओळखीचे नाही, एकटा कसा राहणार, गेलासच का?’

यूएनआय
Saturday, 31 October 2020

फ्रेंच पोलिसांच्या चौकशीत हल्लेखोर हा ट्युनिशियाचा नागरिक असल्याचे आढळून आले. त्याचे नाव इब्राहिम इस्साऔ असे असून तो 47 वर्षांचा आहे. अल्लाहू अकबर अशी घोषणा वारंवार देत त्याने एका महिलेचा शिरच्छेद केला, तर अन्य दोघांची हत्या केली. त्यावेळी त्याच्याकडे कुराणची प्रत होती. पोलिसांशी झटापट झाल्याने तो गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

निस (फ्रान्स) - नीसमधील चर्चपाशी चाकूने वार करून तीन जणांना ठार केलेला हल्लेखोर ट्युनिशीयाचा असून त्याच्या या कृत्यामुळे आईला अश्रू अनावर झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फ्रेंच पोलिसांच्या चौकशीत हल्लेखोर हा ट्युनिशियाचा नागरिक असल्याचे आढळून आले. त्याचे नाव इब्राहिम इस्साऔ असे असून तो 47 वर्षांचा आहे. अल्लाहू अकबर अशी घोषणा वारंवार देत त्याने एका महिलेचा शिरच्छेद केला, तर अन्य दोघांची हत्या केली. त्यावेळी त्याच्याकडे कुराणची प्रत होती. पोलिसांशी झटापट झाल्याने तो गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सौदी अरेबियातील अल-अरेबिया टीव्हीने इब्राहिम याच्या आईची प्रतिक्रिया दाखविली असून त्यात त्यांना अश्रू अनावर झाले. इब्राहिमने फ्रान्समध्ये दाखल झाल्यानंतर आईशी संपर्क साधला. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. तो काय करणार होता याची काहीच कल्पना नव्हती. त्या फोनवर म्हणाल्या, तुला फ्रेंच भाषा येत नाही. तेथे तुझ्या कुणी ओळखीचे नाही. तू एकटा तेथे कसा राहणार आहेस, तू कशासाठी गेला आहेस तेथे...

इब्राहिमच्या भावाने सांगितले की, आपण एका चर्चेसमोर झोपणार असल्याचे त्याने कळविले. त्याने तेथील फोटोही पाठविला. 

दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी आणखी एका संशयिताला शुक्रवारी अटक करण्यात आली. हा संशयित हल्लेखोर इब्राहिमच्या संपर्कात होता.

Edited By - Prashant Patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murderer attack in france crime

Tags
टॉपिकस