एलॉन मस्क भाऊची गोष्टच न्यारी! बिटकॉईनचा उल्लेख करताच झाला चमत्कार

bitcoin
bitcoin

ट्विटरवरील परिचयातील उल्लेखानंतर ३७ हजार डॉलरवर दर
लंडन - टेस्ला समुहाचे संस्थापक आणि जगातील आघाडीचे उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्विटरवरील परिचयात बिटकॉईनचा नुसता उल्लेख करताच दरात सुमारे १५ टक्के वाढ झाली.

मस्क यांचे ट्विटरवर कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. हा अद्ययावत आकडा चार कोटी ३७ लाख इतका आहे. शेअर बाजारात काहीतरी घडेल अशा पोस्ट किंवा वक्तव्य करण्यासाठी ते ओळखले जातात. पूर्वी याची अनेकदा प्रचिती आली आहे. त्यांनी परिचयात बिटकॉइनचा उल्लेख हॅशटॅगसह केला. याव्यतिरिक्त त्यांनी कोणताही तपशील दिला नव्हता. तरिही हा दर काही क्षणांत ३५ हजार डॉलरच्या वर गेला.

लंडन शेअर बाजारात ट्रेडिंग सुरु होताच स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊ वाजून १३ मिनिटांनी हा दर ३५ हजार ८८५ डॉलर इतका होता. त्यानंतर नऊ वाजून ३६ मिनिटांनी तो तब्बल ३७ हजार ८०० डॉलर इतका झाला. त्याआधी मस्क यांनी आज डॉजकॉईनचाही दर सुमारे तीनशे टक्क्यांनी वाढविला. त्यांनी डग मासिकाचे छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केले. त्यानंतर ही घडामोड घडली.वन रिव्हर अॅसेट मॅनेजमेंटचे तज्ज्ञ एरिक पीटर्स यांनी सांगितले की, डिजिटल मालमत्तेत एक अब्ज डॉलरने वाढ झाली.ब्रिजवॉटर संस्थेचे तज्ज्ञ रे डॅलिओ यांनी सांगितले की, बिटकॉईन हा एक आविष्कार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाठिंबा महत्त्वाचा
ब्लुमबर्ग इंटेलिजन्सचे कमॉडीटी तज्ज्ञ माईक मॅक््ग्लोन यांनी सांगितले की, ३० हजार डॉलरचा दर महत्त्वाचा पाठिंबा आहे. दर घसरल्यानंतर संस्थात्मक पातळीवर खरेदीत वाढता रस निर्माण होत असल्याचे दिसून येते.

मीमना उधाण
मस्क यांच्या ट्विटनंतर हे घडताच ट्विटरवर मीमना उधाण आले. त्यात जोम, उत्साह अशा अर्थाच्या इंग्रजीतील Elan शब्दाऐवजी Elon असा उल्लेख करणारे मीम होते. आणखी एका युजरने हा सिग्नल आहे का, असा प्रश्न करीत सोशल मिडीयावरील व्हॉट्‍स ॲपच्या संदर्भाने संभाव्य बदलाच्या चर्चेत भर टाकली. एलॉन मस्क इफेक्ट असेही मीम होते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com