Quran Sharif : स्वीडनमध्ये कुराण जाळण्याच्या प्रकरणावर सौदी अरेबियामध्ये मुस्लिम देश एकत्र, म्हणाले अशा देशांना...

स्वीडनची राजधानी स्टोकहोम इथे एका मशिदीबाहेर पवित्र कुराण जाळल्याचे प्रकरण आता चांगलेच जोर धरू लागले आहे.
Quran Sharif
Quran Sharifsakal

Quran Sharif - स्वीडनमध्ये कुराण जाळण्याच्या घटनेने मुस्लिम देशांना भडकवले आहे. या प्रकरणावर मुस्लिम देशांच्या संघटनेने रविवारी एक आपत्कालीन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ओआईसी चे महासचिव हिसैन ब्राहिम ताहा यांनी या प्रकरणाची कडक शब्दांत निंदा केलीये.

Quran Sharif
Mumbai : परिवहन विभागाच्या बढत्या, बदल्यांसाठी तारीख पे तारीख

स्वीडनची राजधानी स्टोकहोम इथे एका मशिदीबाहेर पवित्र कुराण जाळल्याचे प्रकरण आता चांगलेच जोर धरू लागले आहे. इस्लामिक देशांची सर्वात मोठी संघटना ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (OIC) यांनी या संदर्भात एक आपातकालीन बैठक बोलावली ज्यात "इस्लामोफोबिया" चा सामना कसा करावा आणि कुराणाचा अपमान कसा रोखावा यासंदर्भात वैश्विक स्तरावर काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा करण्यात आली.

Quran Sharif
Sharad Pawar : गडी पुन्हा एकटा निघाला! 82 वर्षाचा 'तरुण' आज गुरूच्या साक्षीने करणार मोठा एल्गार!

५७ इस्लामिक देशांच्या प्रतिनिंधीचा समावेश असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने सौदी अरेबिया येथील जेद्दा इथल्या मुख्यालयात आपात्कालीन बैठक घेतली. ही घटना बकरी ईदच्या दिवशी घडल्याने इस्लामिक देश अधिकच भडकले आहेत.

सौदी अरब, संयुक्त अरब अमीरात, पाकिस्तान, ईरान, इराक, कुवेत यांच्या समवेतच सर्व मुस्लिम देशांनी या घटनेची कडक शब्दांत निंदा केलीये. मोरक्को ने या घटनेच्या निषेधार्थ स्वीडनमधील आपल्या राजदूतांना अनिश्चित काळासाठी परत बोलावले आहे.

Quran Sharif
Mumbai Rivers Algae : ठाणे जिल्ह्यातील नद्यांना जलपर्णीचा विळखा; प्रशासनाने वेळीच लक्ष दिले असते तर ...

ओआयसी ने आपतकालीन बैठकीनंतर एक परिपत्रक जाहीर केले असून त्यात " पवित्र कुराणाचा अपमान करणाऱयांविरुद्ध ओआयसी च्या सदस्य देशांनीं एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

या परिपत्रकात ओआयसी चे महासचिव हिसैन ब्राहिम ताहा यांनी सांगितले आहे की " कुराणाचा अपमान ही एक सामान्य इस्लामोफोबिक घटना नाही" तसेच त्यांनी " जगभरातील देशांनी धार्मिक दहशत वाढवणाऱ्या विरोधात आंतरराष्ट्रीय कायद्याच पालन करून प्रतिबंध करावा" असे आवाहन देखील केले आहे.

Quran Sharif
Mumbai Rivers Algae : ठाणे जिल्ह्यातील नद्यांना जलपर्णीचा विळखा; प्रशासनाने वेळीच लक्ष दिले असते तर ...

ताहा यांनी कुराण जाळणाऱ्या इसमाची "सलवान मोमीका" ची त्याच्या घृणास्पद कृत्याची कडक शब्दांत निंदा केली आहे. या प्रकरणा विरोधात इराक ची राजधानी बगदाद इथे स्वीडिश दूतावासा बाहेर विरोध प्रदर्शन करण्यात आले. सोबतच इराक,कुवेत , युएई आणि मोरोक्को ने देखील स्वीडनच्या राजदूतांना बोलावून त्यांचा विरोध नोंदवला आहे.

या प्रकरणा संदर्भात स्वीडन सरकारने सांगितले आहे " स्वीडनच्या एका नागरिकाने केलेला विरोध सर्व मुस्लिमांसाठी आक्रमक ठरू शकतो. आम्ही या कृत्याची निंदा करतो. स्वीडन सरकारची विचारधारा अश्या घटनांचे समर्थन करत नाहीत. "

Quran Sharif
Pune Crime : सासूचे घर खाली करण्याचा न्यायालयाचा सुनेला आदेश

स्वीडन पोलिसांनी अनेकदा त्याला नकार दिला होता...

स्वीडन पोलिसांनी पुढील गंभीर परिणामांपासून वाचण्यासाठी मोमीकाला मशिदीबाहेर कुराण जाळण्यास अनुमती दिली नव्हती. मोमिकाने अनेकदा पोलिसांना आंदोलनासाठी आवेदन दिले होते परंतु स्वीडन पोलिसांनी अनेकदा त्याला नकार दिला होता.

त्यानंतर मोमिकाने कोर्टाचा रस्ता अवलंबला होता. कोर्टाने अभिव्यक्ती स्वातंत्र्या अंतर्गत मोमिकाला विरोध प्रदर्शनाची अनुमती दिली होती. नंतर पोलिसांनी सांगितले की मोमिकाने मशिदीच्या अतिशय जवळ जात अपराध केला आहे, ज्यासाठी धर्मविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी त्यावर आता कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com