सौंदर्य स्पर्धा गाजवणाऱ्या तरुणीने हाती घेतले शस्त्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Htar Htet Htet

सौंदर्य स्पर्धा गाजवणाऱ्या तरुणीने हाती घेतले शस्त्र

यंगून (Myanmar Beauty Queen)- म्यानमारमध्ये लष्करी उठावाच्या विरोधात आवाज उठवीत असलेल्या नामांकित व्यक्तींमध्ये आता एका सौंदर्यवतीची भर पडली आहे. हटार हटेट असे तिचे नाव आहे. २०१३ मध्ये थायलंडमधील स्पर्धेत म्यानमारचे प्रतिनिधित्व केलेल्या हटारने बंदूक हातात घेत जुलुमी लष्कराला आव्हान दिले आहे. एक फेब्रुवारी रोजी लोकनेत्या आँग सान स्यु की यांना स्थानबद्ध करण्यात आल्यापासून म्यानमारमध्ये अनागोंदी माजली आहे. उठाव होऊन मंगळवारी शंभर दिवस पूर्ण झाले. यानंतरही अनेक शहरांत आणि गावांमध्ये आंदोलन होत आहे. ते दडपण्यासाठी लष्कर बळाचा वापर करीत आहे. यानंतरही सामान्य नागरीकांनी रस्त्यावर येणे थांबविलेले नाही. यात नामवंत व्यक्तींनीही भाग घेतल्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. लोकशाहीची फेरस्थापना व्हावी अशी जनतेची मागणी आहे. या घडामोडींमुळे म्यानमारची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. (Myanmar Beauty Queen Picks Up Arms Against Military Junta)

हटारने २०१३ मध्ये थायलंडमधील पहिल्या ग्रँड इंटरनॅशनल ब्युटी पेजंटमध्ये भाग घेतला होता. त्यात ६० देशांचे स्पर्धक सहभागी झाले होते. त्या स्पर्धेमुळे हटारला ग्लॅमर मिळाले. हटार ३२ वर्षांची असून जिम्नॅस्टीक्सची प्रशिक्षक आहे. तिने ट्विटरवर काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. त्यानुसार ती वांशिक बंडखोरांच्या एखाद्या गटात सहभागी झाल्याचे दिसते. तिने काळ्या रंगाचा लढाऊ जवानांचा गणवेश परिधान केला आहे. तिच्या हातात बंदूक आहे. त्यावरून सीमेवरील एखाद्या जंगलात ती बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घेत असल्याचेही स्पष्ट होते. यंदा मिस ग्रँड म्यानमार स्पर्धेत सहभागी झालेली सौंदर्यवती हान लाय हिने सुद्धा उठावाविरुद्ध आवाज उठविला असून लष्कराच्या कायदेमंडळावर टीका केली आहे.

हेही वाचा: 'ही भयावह क्रूरता आहे'; म्यानमार लष्कराची हिंसक दडपशाही पाहून हळहळले बायडन

सौंदर्यवतीचे बोल

आता प्रतिआक्रमणाचा लढा देण्याची वेळ आली आहे. तुम्ही शस्त्र, पेन, किबोर्ड असे जे काहीही हातात घ्या किंवा लोकशाहीवादी चळवळीला देणगी द्या. ही क्रांती यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने छोटासा वाटा उचललाच पाहिजे. मी शक्य तेवढी झुंज देईन. प्रत्येक गोष्टीचा त्याग करण्यास मी तयार असून त्यासाठी सज्ज झाले आहे. अगदी माझ्या प्राणांच्या रूपाने किंमत द्यावी लागली तरी सुद्धा त्यासाठी माझी तयारी आहे. क्युबाचे क्रांतिकारक चे गुव्हेरा यांनी म्हटल्याप्रमाणे क्रांती ही काही पिकले फळ आपोआप जमिनीवर गळून पडते तशी होत नसते. ते फळ पिकविण्यासाठी आणि पर्यायाने पाडण्यासाठी तुम्हाला प्रयास घ्यावे लागतात. आपल्याला जिंकलेच पाहिजे, असं हटार हटेट म्हणाली.

Web Title: Myanmar Beauty Queen Picks Up Arms Against Military

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Myanmar
go to top