
भूकंपाच्या धक्क्याने विध्वंस झालेल्या म्यानमारला आणखी भूकंपाचे धक्के बसले. युएस जिऑलॉजिकल सर्वेने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा झालेल्या भूकंपाचे धक्के ४.७ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे होते. यामुळे अनेक भागात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या भूकंपाचं केंद्र राजधानी नेपीडॉच्या जवळ असल्याचं सांगण्यात येतंय.