

Myanmar Airstrike Representative image
esakal
Moe Bye: म्यानमारमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धाची भीषणता पुन्हा एकदा समोर आली आहे. विस्थापितांच्या छावणीत राहणाऱ्या एका जोडप्याच्या लग्नाची तयारी सुरू असलेल्या घरावर लष्कराने आज हवाई हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात २१ जणांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच मुलांचा समावेश असल्याची माहिती बचावकार्य करणाऱ्या संस्थेने दिली.