म्यानमारचे अध्यक्ष तीन क्याव यांचा राजीनामा

वृत्तसंस्था
बुधवार, 21 मार्च 2018

तीन क्याव यांच्या राजीनाम्याची अफवा जवळपास वर्षभर पसरली होती, पण तेथील सरकार व नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी पार्टीचे अधिकारी सातत्याने ही बातमी नाकारत होते.   

नवी दिल्ली : म्यानमारचे अध्यक्ष तीन क्याव यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे, असे तेथील स्थानिक माध्यमांनी अध्यक्ष कार्यालयाच्या फेसबुक पेजवर केलेल्या पोस्टवरून सांगितले. 

म्यानमारमध्ये शतकानुशतके लष्करी नेतृत्वाच्या वर्चस्वाखाली असलेल्या सत्तेत 2016 मधील निवडणूकीनंतर चित्र पालटले व तीन क्याव हे अध्यक्ष झाले. पण, तीन क्याव हे प्रासंगिक नेते होते. त्यांच्या विरोधी पक्षात असलेले आँग सान सू की हे आता अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारतील, अशी माहिती बीबीसीकडून सांगण्यात आली आहे. 

अध्यक्ष कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून सही न केलेली एक पोस्ट शेअर झाली, त्यात असे नमूद केले होते की, तीन क्याव यांनी 21 मार्चला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, कारण त्यांना आता आरामाची गरज आहे. मंत्रिमंडळाची पुनर्स्थापना पुढच्या सात दिवसात होईल. अशी माहिती फ्रंटीअर म्यानमार या न्युज साईटने दिली आहे. 

तीन क्याव यांच्या राजीनाम्याची अफवा जवळपास वर्षभर पसरली होती, पण तेथील सरकार व नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी पार्टीचे अधिकारी सातत्याने ही बातमी नाकारत होते.   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Myanmar President Htin Kyaw has resigns