गुगलमुळे दोघांचे नको 'ते' क्षण जगाने पाहिले...

वृत्तसंस्था
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

दोघे जण एकांतात गेले होते. रस्त्याच्या कडेला मोटार उभी केल्यानंतर मोटारीच्या मोटारीच्या बोनेटवर दोघे नको त्या अवस्थेत होते. मात्र, त्याचवेळी गुगलचा स्ट्रीट व्ह्यू कॅमेऱयाने हे छायाचित्र टिपले आणि जगभर व्हायरल झाले.

तैपेई (तैवान) : दोघे जण एकांतात गेले होते. रस्त्याच्या कडेला मोटार उभी केल्यानंतर मोटारीच्या मोटारीच्या बोनेटवर दोघे नको त्या अवस्थेत होते. मात्र, त्याचवेळी गुगलचा स्ट्रीट व्ह्यू कॅमेऱयाने हे छायाचित्र टिपले आणि जगभर व्हायरल झाले.

दोघांचे नको त्या अवस्थेतील छायाचित्र गुगलने अपलोड केल्यानतंर नेटिझन्स छूम करून पाहात होते. जगभर त्या छायाचित्राची चर्चा होऊ लागली. अखेरच गुगलच्या लक्षात आल्यानंतर ते छायाचित्र ब्लर करण्यात आले. मात्र, तो पर्यंत ते छायाचित्र व्हायरल झाले होते. जगभरातील वाहन चालकांच्या सोईसाठी गुगल मॅपवर स्ट्रीट व्ह्यू हा पर्याय देते. मात्र, अनेकदा त्यामध्ये त्यावेळची छायाचित्रे कैद झालेली दिसतात. असाच एक धक्कादायक प्रकार तैवानमधील तायचुंग येथील शांतीयन रस्त्यावर घडला आहे. एक जोडपे निर्जन ठिकाणी गेले होते. रस्त्याच्या कडेला मोटार उभी करून ते सेक्स करत होते. मात्र, त्याचवेळी गुगलचे स्ट्रीट व्ह्यू नोंद करणारा 360 डिग्रीचा कॅमेरा तेथून गेला आणि हा प्रकार कॅमेऱयात कैद झाला.

गुगलच्या पॉलिसीमध्ये अश्लिलतेला कोणताही थारा दिला जात नाही. परंतू एका नेटिझन्सला मोटारीसमोर काहीतरी दिसले, म्हणून त्याने झूम करून पाहिले. यानंतर हा प्रकार उघड झाला. काही क्षणातच जगभरातील नेटिझन्सनी हे छायाचित्र पाहिले आणि गुगलवर टीका करण्यास सुरवात केली. गुगलच्या लक्षात आल्यानंतर त्यांना हा व्ह्यू ब्लर करावा लागला.

दरम्यान, गुगलच्या कॅमेरामध्ये यापूर्वीही सेक्स करतानाची छायाचित्रे अमेरिका व ऑस्ट्रेलियात कैद झाली आहेत. गुगलला असे काही आढळल्यास तेथील दृष्ये ब्लर केली जातात. मात्र, गुगलला स्वत:हून हे शोधता येत नाही. युजरकडूनच याबाबतची माहिती गुगलला समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naked cuddling couple caught by Google Street View in Taiwan