
20 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांना आमंत्रणे पाठवली आहेत. मात्र, या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव नसल्याने राजकीय आणि मुत्सद्दी वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.