इस्त्राईलमध्येही झळकले मोदींचे पोस्टर; प्रचारासाठी वापर

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जुलै 2019

मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेत्यानाहू यांनी अनेक राष्ट्राध्यक्षांचे फोटो लावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या फोटोंचा वापर नेतन्याहू निवडणूक प्रचारासाठी करत आहेत.

तेल अविव : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत व इस्त्राईलचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तसेच मोदी व इस्त्राईलचे अध्यक्ष बेंजामिन नेत्यानाहू यांची मैत्री जगात प्रसिद्ध आहे. आता यांच्या मैत्रीचे पडसाद इस्त्राईलमधील पोस्टवर दिसू लागले आहेत. आगामी निवडणूकांसाठी नेत्यानाहू यांनी मोदींचे फोटो त्यांच्या प्रचाराच्या पोस्टर्सवर लावले आहेत.  

इस्त्राईलमध्ये सप्टेंबर महिन्यात निवडणूका होणार आहेत. या निवडणूकांच्या प्रचाराची तयारी सुरू झाली असून नेत्यानाहू यांनी आपल्या प्रचाराच्या बॅनरवर मोदी व त्यांचा हास्तांदोलन करतानाचा फोटो वापरला आहे व हे पोस्टर इस्त्राईलमध्ये रस्तोरस्ती लावले आहेत. 

मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेत्यानाहू यांनी अनेक राष्ट्राध्यक्षांचे फोटो लावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या फोटोंचा वापर नेतन्याहू निवडणूक प्रचारासाठी करत आहेत.

नेत्यानाहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले होते. त्यामुळे बेंजामिन नेत्यानाहू यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. बेंजामिन नेत्यानाहू हे इस्त्रायलच्या 71 वर्षाच्या इतिहासातील इस्त्रायलचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती ठरु शकतात.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू ९ सप्टेंबर रोजी भारत दौऱ्यावर येणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेतान्याहून दिल्लीमध्ये भेट घेतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Modi s poster in Israel by Benjamin Netanyahu