VIDEO: NASA ने रचला इतिहास; मंगळावर हेलिकॉप्टरचे उड्डाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NASA Ingenuity Helicopter

VIDEO: NASA ने रचला इतिहास; मंगळावर हेलिकॉप्टरचे यशस्वी उड्डाण

वॉशिंग्टन- नासाच्या (NASA) हेलिकॉप्टरने मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उड्डाण केले आहे. Perseverance roverने पृथ्वीवर पाठवलेल्या फोटोंमधून हे स्पष्ट झाले आहे. नासाने याची पुष्टी करत म्हटलंय की, इनजेन्यूटी हेलिकॉप्टरने आपलं पहिलं उड्डाण घेतलं. एका दुसऱ्या ग्रहावर एअरक्राफ्ट उडण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ नासाकडून शेअर करण्यात आला आहे. यात एक ड्रोनसारख्या आकाराचे हेलिकॉप्टर मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावरुन 3 मीटरपर्यंत उंच उडते आणि पुन्हा जमिनीवर येऊन स्थिरावते.

इनजेन्युटी हेलिकॉप्टरने देखील ब्लॅक अँड व्हाईट फोटो पाठवला असून यात त्याची छाया मंगळाच्या पृष्ठभागावर पडताना दिसली आहे. नासाने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये संशोधक आनंद व्यक्त करताना दिसत आहे. टीम लिडर मीमी आंग यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आपण आता म्हणून शकतो की माणसाने दुसऱ्या ग्रहावर एअरक्राफ्ट उडवलं आहे. आम्ही खूप काळापासून मंगळावरील 'राईट ब्रदर्स' क्षणाची वाट पाहात होता आणि ते प्रत्यक्षात घडलं आहे.

Web Title: Nasa Ingenuity Helicopter Takes Flight On Mars First On Another

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :marsPlanet