Chandrayaan 2 : नासाला मिळाले 'विक्रम' लँण्डरच्या जागेचे फोटो..

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

चंद्रावर रात्र सुरू झाल्यानंतर विक्रमशी संपर्क करण्याच्या सर्व आशा धूसर होणार आहेत. मात्र त्यापूर्वी दक्षिण ध्रुवावर असलेल्या विक्रमचे नासाच्या ल्यूनार रिकनाईसन्स ऑर्बिटरने 17 सप्टेंबरला फोटो काढले असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

ह्यूस्टन : चांद्रयान विक्रम लँण्डरशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतानाच, नासाने आपला मून ऑर्बिटर विक्रमचे फोटो काढेल असे जाहीर केले होते. नासाच्या मून ऑर्बिटरने विक्रमची छायाचित्रे काढली असल्याचा दावा नासाच्या एका शास्त्रज्ञाने केला आहे, असे एका माध्यमाने दिलेल्या वृत्तात दिली आहे. 

'विक्रम'चे फोटो 'नासा'कडे!

चंद्रावर रात्र सुरू झाल्यानंतर विक्रमशी संपर्क करण्याच्या सर्व आशा धूसर होणार आहेत. मात्र त्यापूर्वी दक्षिण ध्रुवावर असलेल्या विक्रमचे नासाच्या ल्यूनार रिकनाईसन्स ऑर्बिटरने 17 सप्टेंबरला फोटो काढले असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. या सर्व छायाचित्रांचे विश्लेषण सुरू असल्याचेही या वृत्तात म्हणले आहे. 21 सप्टेंबरला चंद्रावर रात्र होईल. 

नासाने विक्रमचे फोटो काढल्याच्या वृत्ताला एलआरओचे शास्त्रज्ञ जॉन केलर यांनी दुजोरा दिला आहे. एलआरओसीची टीम या फोटोंचे विश्लेषण व अभ्यास करेल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nasa Orbiter Captures Images and sends for analysis Of Vikram Lander