esakal | नासाच्या हेलिकॉप्टरचे मंगळावर दुसऱ्यांदा उड्डाण

बोलून बातमी शोधा

nasa helicopter

नासाच्या हेलिकॉप्टरचे मंगळावर दुसऱ्यांदा उड्डाण

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

केप कॅनव्हेराल- मंगळ ग्रहावर लँड झालेल्या ‘नासा’च्या ‘इंजेन्युटी’ हेलिकॉप्टरने दुसऱ्यांदा चाचणी उड्डाण केले. पहिल्या उड्डाणाच्या तुलनेत हे उड्डाण अधिक उंच आणि दीर्घकाळाचे होते. ‘नासा’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘इंजेन्युटी’ हेलिकॉप्टरने काल ५२ सेकंद उड्डाण करत १६ फूट उंची गाठली. याशिवाय सात फूटापर्यंत बाजूच्या दिशेनेही ते गेले. पहिल्या चाचणीवेळी हे हेलिकॉप्टरने १० फुटांची उंची गाठली होती, तर ते ३९ सेकंद हवेत होते. ‘इंजेन्युटी’ हेलिकॉप्टरने सोमवारी प्रथम उड्डाण केल्याने ते ‘परग्रहावर उडालेले पहिले हेलिकॉप्टर’ ठरले होते.

हेही वाचा: ‘नासा’ने टिपला लँडिंगचा थरार

राइट बंधूंनी १९०३ मध्ये प्रथम उडविलेल्या विमानाचा एक बारीक तुकडा ‘इंजेन्युटी’ हेलिकॉप्टरमध्ये ठेवण्यात आला आहे. मंगळावर हेलिकॉप्टर उडविण्यात कोणत्या अडचणी येतात, याचा अभ्यास आणि चाचणी सध्या सुरु आहे. मंगळावरील वातावरण पृथ्वीवरील वातावरणाच्या तुलनेत अत्यंत विरळ आहे. येत्या एक ते दीड आठवड्यात आणखी तीन चाचण्या घेण्याचा ‘नासा’चे नियोजन आहे. पुढील प्रत्येक चाचणीवेळी ‘इंजेन्युटी’ हेलिकॉप्टर अधिक उंची गाठणार आहे. हे हेलिकॉप्टर ‘पर्सिव्हरन्स’ रोव्हरच्या साह्याने मंगळावर उतरले आहे.