संजय राऊतांचे नाव घेऊन माझा दिवस का खराब करताय?

संजय राऊतांचे नाव घेऊन माझा दिवस का खराब करताय?

'त्यांचं नाव घेऊन माझा दिवस का खराब करताय?' असं मिश्कील वक्तव्य भाजपचे प्रदेक्षाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर केलं आहे. चंद्रकांत पाटील पुण्यात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली. संजय राऊत यांनी पुणे मनपा निवडणुकीबद्दल केलेल्या वक्त्वायबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पाटील म्हणाले की, त्यांनी सर्वच्या सर्व 280 जागा लढवाव्यात. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. संजय राऊत परवा पुण्यात म्हणाले की, पुण्यात शिवसेना स्वबळावर लढेल किंवा आघाडीत लढली तर 80 जागा लढेल.

पेट्रोल-डिझेल दरवाढीवर काय म्हणाले?

अजित पवार काय किंवा उद्धव ठाकरे काय? त्यांचं म्हणणं आहे की सगळंच केंद्राने करावे. मास्क केंद्राने द्यावे, लस केंद्राने द्यावी. राज्याने आधी कर कमी करावा मग केंद्राला म्हणावे. इंधन दरवाढीसाठी सरसकट केंद्राकडे बोट दाखवणं चुकीचं आहे. राज्य सरकारनं कर कमी केला तर इंधनाचे दर नियंत्रणात राहतील.

संजय राऊतांचे नाव घेऊन माझा दिवस का खराब करताय?
स्वप्नात दिसतात मृत लोक; रहस्यमय आजारानं नागरिक त्रस्त

राज्यातील अनलॉकवर काय म्हणाले?

उद्धव सरकारमध्ये प्रत्येक गोष्टीत संदिग्धता असते, क्लिअरिटी नाही. ठाकरे सरकारमध्ये कोरोनात किंवा मराठा आरक्षणमध्ये क्लिअरिटी नाही. सरकारमधील प्रत्येकाला प्रेस समोर बोलण्याची घाई झाली आहे.

संजय राऊतांचे नाव घेऊन माझा दिवस का खराब करताय?
HIV+ महिलेच्या शरिरात 216 दिवस कोरोना; 32 वेळा झाला म्युटेट

खडसेंनाही दिलं उत्तर?

नाथाभाऊ आजही आमचे नेते आहेत. फक्त तिकडे गेल्यावर खरं बोलले पाहिजे, एवढंचं मत आहे. आम्हाला धोका झाला याचा दुःख आहेच, ही रिऍक्शन आहे.

मुश्रीफांच्या वक्तव्यावर काय म्हणाले?

पहिली लाट ओसरल्यावर लसीकरण केंद्रांवर माणसं फिरकत नव्हती. दुसऱ्या लाटेत धावाधाव सुरु झाली, आता उत्पादन योग्य सुरु आहे. आता स्थिती सुधारत आहे. दरवेळी फक्त केंद्र केंद्र करतात. तुम्हीही काहीतरी करा.

संजय राऊतांचे नाव घेऊन माझा दिवस का खराब करताय?
मुंबईचा माजी क्रिकेटर म्हणतो,"मी अश्विनला सर्वोत्तम मानतच नाही"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com