पंतप्रधान विक्रमसिंघेंकडून नवीन सरकारच्या हालचाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nationwide curfew was lifted for 12 hours Movements of new government Prime Minister Wickremesinghe
पंतप्रधान विक्रमसिंघेंकडून नवीन सरकारच्या हालचाली

पंतप्रधान विक्रमसिंघेंकडून नवीन सरकारच्या हालचाली

कोलंबो : श्रीलंकेत शनिवारी बारा तासांसाठी देशव्यापी संचारबंदी हटविण्यात आली. तसेच या कालावधीदरम्यान कडक निर्बध शिथिल केले. दुसरीकडे नवे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे हे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. यानुसार राजकीय स्थिरता येईल आणि आर्थिक संकटातून बाहेर काढता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आज सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी मागे घेण्यात आली होती.

नऊ मे रोजी लागू केलेली संचारबंदी १२ आणि १३ मे रोजी काही काळासाठी मागे घेतली होती. संचारबंदी शिथिल केल्यानंतर नागरिकांनी अत्यावश्‍यक वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली. महिंदा राजपक्ष यांनी सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यापूर्वी काही तास अगोदर सरकार समर्थकांनी विरोधकांवर हल्ले केले होते. त्यामुळे अध्यक्ष राजपक्ष यांनी लष्कराला पाचारण केले व संचारबंदी लागू केली. संचारबंदीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे विक्रमसिंघे यांनी आज संचारबंदी शिथिल केली.

Web Title: Nationwide Curfew Was Lifted For 12 Hours Movements Of New Government Prime Minister Wickremesinghe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top