esakal | दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या हालचालींवर नाटोचे लक्ष हवे
sakal

बोलून बातमी शोधा

harjit sajjan

तज्ञांच्या ऑनलाईन चर्चासत्रात त्यांनी सांगितले की, परदेशी नागरिकांना ओलीस ठेवण्याची कथित राजनीती चीनकडून राबविली जाते. एका माजी राजनैतिक अधिकाऱ्यासह कॅनडाच्या दोन नागरिकांना असेच डांबून ठेवण्यात आले आहे. हुवेईचे मुख्य वित्त अधिकारी मेंग वँझू यांना व्हँकुव्हरमध्ये दोन वर्षांपूर्वी अटक झाली. त्यास प्रत्युत्तर म्हणून चीनने ही चाल केली आहे. अशी चाल नियमांवर आधारीत जागतिक रचनेच्यादृष्टिने चांगली नसते.

दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या हालचालींवर नाटोचे लक्ष हवे

sakal_logo
By
पीटीआय

टोरांटो - दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या हालचाली अर्थातच चिंता वाढविणाऱ्या आहेत. त्यामुळे नाटोने त्यावर लक्ष ठेवावे, असे आवाहन कॅनडाचे संरक्षण मंत्री हरजीत सज्जन यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तज्ञांच्या ऑनलाईन चर्चासत्रात त्यांनी सांगितले की, परदेशी नागरिकांना ओलीस ठेवण्याची कथित राजनीती चीनकडून राबविली जाते. एका माजी राजनैतिक अधिकाऱ्यासह कॅनडाच्या दोन नागरिकांना असेच डांबून ठेवण्यात आले आहे. हुवेईचे मुख्य वित्त अधिकारी मेंग वँझू यांना व्हँकुव्हरमध्ये दोन वर्षांपूर्वी अटक झाली. त्यास प्रत्युत्तर म्हणून चीनने ही चाल केली आहे. अशी चाल नियमांवर आधारीत जागतिक रचनेच्यादृष्टिने चांगली नसते. त्यामुळे चीनच्या खऱ्या महत्त्वाकांक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. सज्जन यांनी पुढे सांगितले की, एखाद्या समस्येनंतर प्रतिसाद देण्यापुरता हा विषय मर्यादीत नाही. नाटो समूह म्हणून एकत्रित प्रयत्न केले जातात असे चित्र कोणत्याही देशाला दिसले पाहिजे. संरक्षण आणि परिणामांची तमा न बाळगता सांघिक कृतीचा स्पष्ट संदेश देण्याची गरज आहे.

इस्लामिक स्टेटच्या संपर्कातील दोघे ताब्यात; 14 जणांना पाठवले सीरियाला

मुक्त व्यापार नाही
कॅनडा आणि चीन यांच्यातील संबंध टोकाला गेले आहेत. त्यामुळे चीनबरोबर मुक्त व्यापार कराराची शक्यता कॅनडाने फेटाळून लावली आहे.

Edited By - Prashant Patil