इस्लामिक स्टेटच्या संपर्कातील दोघे ताब्यात; 14 जणांना पाठवले सीरियाला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

इस्लामिक स्टेटसाठी काम करणाऱ्या लोकांची ओळख एनआयएने पटवली आहे. तसंच जे लोक इस्लामिक स्टेटसाठी काम करत होते त्यांच्या संपर्कात आले होते त्यांचाही शोध घेतला जात आहे

बंगळुरू - राष्ट्रीय तपास संस्थेनं इस्लामिक स्टेटसाठी काम करणाऱ्या दोघांना बंगळुरुतून अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघेही इस्लामिक स्टेटच्या संपर्कात होते आणि त्यांनी इराक, सिरियाचा दौराही केला होता अशी माहिती समोर येत आहे. 2013-14 या वर्षात जवळपास 14 जण इराक आणि सिरियाला गेले होते. यातील दोघांचा मृत्यू इस्लामिक स्टेटसाठी लढताना झाला होता. तर बाकीचे सर्वजण परत आले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, राष्ट्रीय तपास संस्थेनं दोघांना अटक केली असून ते इस्लामिक स्टेटसाठी काम करण्यासाठी लोक तायर करत होते. तसंच सिरियामध्ये जाण्यासाठी पैसेही पुरवत होते. अटक करण्यात आलेल्यांची नावे अहमद अब्दुल (वय 40) आणि इरफान नासिर (वय 33) अशी आहेत. त्यांचे इतर सहकारी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अहमद अब्दुल हा तामिळनाडुतील रामनाथपुरम इथला आहे तर नासिर बंगळुरूतील आहे. दोघांनाही बुधवारी अटक करण्यात आली. 

हे वाचा - व्हॅक्सिनबद्दल हॅरिस यांच्या वक्तव्याने राष्ट्राध्यक्षांची विश्वासार्हता कमी होऊ शकते - माइक पेन्स

इस्लामिक स्टेटसाठी काम करणाऱ्या लोकांची ओळख एनआयएने पटवली आहे. तसंच जे लोक इस्लामिक स्टेटसाठी काम करत होते त्यांच्या संपर्कात आले होते त्यांचाही शोध घेतला जात आहे. इरफान नासिरने इस्लामिक स्टेटसाठी काम करण्यासाठी पाच लोकांना परदेशात जाण्यासाठी पैशांची व्यवस्था केली होती. 

2016 मध्ये केरळमधून 22 लोकांचे एक पथक इराक आणि सिरियाला पाठवण्यात आलं होतं. हे लोक इस्लामिक स्टेटच्या संपर्कात होते. इस्लामिक स्टेटच्या संपर्कात आलेला हा सर्वात मोठा ग्रुप होता. याशिवाय इस्लामिक स्टेटसाठी काम करणारे लोक इराक, सिरिया, अफगाणिस्तानला गेले होते. मात्र कसारगौडनंतर हे सर्वात मोठं प्रकरण आहे ज्यामध्ये 12 ते 13 इराक आणि सिरियाला गेले होते. 

हे वाचा - सोशल डिस्टन्सिंगसाठी नवीन फॉर्म्युला; संसर्गाच्या जोखमीबाबत WHO च्या आयोगाचा अभ्यास

इस्लामिक स्टेटने 2014 मध्ये इराक आणि सिरियावर हल्ला केला होता. त्यानंतर तीन वर्षांनी 2017 मध्ये इस्लामिक स्टेटवर विजय मिळवल्याचं इराकने जाहीर केलं. तर 2019 मध्ये सिरियात इस्लामिक स्टेटला पराभूत केल्याचं म्हटलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NIA arrest two people working islamic state and funding travell to syria