
पाकिस्तानमधील विरोधीपक्ष मुस्लिम लीग-नवाजचे नेते आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुस्लिम लीगचे नेते अताउल्लाहा तरार यांनी ६८ वर्षीय शाहबाझ यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
इस्लामाबाद- पाकिस्तानमधील विरोधीपक्ष मुस्लिम लीग-नवाजचे नेते आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुस्लिम लीगचे नेते अताउल्लाहा तरार यांनी ६८ वर्षीय शाहबाझ यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे शाहबाज हे कॅन्सर पीडित आहेत. त्यामुळं त्यांच्याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानमधील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय एका प्रांतिक मंत्र्यांसह चार संसद सदस्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना महामारीने पाकिस्तानला चांगलंच कवेत घेतल्याचं दिसत आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शाहबाज यांना धनशोधन प्रकरणी राष्ट्रीय उत्तरदायी ब्युरोसमोर (एनएबी) हजर राहावे लागले होते. तेथेच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे. शाहबाज यांना कॅन्सर असल्याने त्यांना एनएबीसमोर हजर राहण्याची सक्ती करू नये. त्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना संक्रमणाचा धोका आहे अशी विनंती आम्ही केली होती. मात्र, एनएबी ने आमची विनंती फेटाळून त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले. जर त्यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर त्याला पंतप्रधान इम्रान खान आणि एनएबीचे अधिकारी जबाबदार असतील, असं वक्तव्य तरार यांनी केलं आहे. शाहबाज यांना कारोना संक्रमणाचा धोका अधिक असल्याने ते सुरुवातीपासूनच वेगळे वेगळे राहत होते. एनएबीमधील काही अधिकाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे हे आधीच स्पष्ट झालं होतं. तरीही शाहबाज यांना बोलावण्यात आलं, असा आरोप लीगने केला आहे.
--------
दिल्लीतील जामा मशिद 'या' तारखेपर्यंत बंदच
--------
कोरोनावर औषध तयार; दहा देशांकडून औषधांची मागणी
--------
मी कॅन्सर पीडित आहे. माझं वय ६८ आहे. त्यामुळं माझं शरीर अशक्त आणि माझी प्रतिकारशक्ती अत्यंत कमी आहे. त्यामुळे डॉक्टरांनी मला घराच्या बाहेर निघण्यासाठी मनाई केली आहे. त्यामुळे मला एनएबी समोर हजर राहण्याची सक्ती करू नये, असं शाहबाज शरीफ यांनी एनएबीला यापूर्वीच लिखित स्वरुपात कळवलं होतं. मात्र, ब्युरोने त्यांची मागणी फेटाळली होती. त्यामुळे विरोधकांनी ब्युरो आणि इम्रान खान यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. दरम्यान, कोरोना विषाणू महामारीने पाकिस्तानमध्ये थैमान घातले आहे. देशात गेल्या 24 तासात 5834 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 20 हजारांच्या पुढे गेली आहे.