YouTube New CEO : भारतीय वंशाचे नील मोहन बनले यूट्यूबचे नवे सीईओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

neal mohan an indian american become ceo of youtube check details here

YouTube New CEO : भारतीय वंशाचे नील मोहन बनले यूट्यूबचे नवे सीईओ

YouTube New CEO : भारतीय वंशाचे नील मोहन यांची YouTube चे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी नील मोहन हे यूट्यूबचे सीपीओ होते. त्यांना बढती देऊन ही जबाबदारी देण्यात आली आहे. नील मोहन 2008 पासून गुगल सोबत काम करत आहेत. 2013 मध्येच कंपनीने त्यांना 544 कोटी रुपयांचा बोनस दिला होता.

मोहन हे माजी सीईओ सुझन डायन वोजिकी यांची जागा घेतील. सुझन यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 54 वर्षीय सुझन यांनी कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचे असून आरोग्यावर आणि वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे त्यामुळेच ती पद सोडत आहे असे कारण दिले आहे. 2014 मध्ये त्या यूट्यूबच्या सीईओ बनल्या होत्या.

नील मोहन कोण आहेत?

नील मोहन यांनी स्टँडफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. नीलने ग्लोरिफाइड टेक्निकल सपोर्टसह त्याच्या करिअरची सुरुवात केली, जिथे त्यांना $60,000 पगार देण्यात आला. याशिवाय नील यांनी एक्सेंचरमध्ये वरिष्ठ विश्लेषक म्हणून काम केले आहे. पुढे त्यांनी DoubleClick Inc मध्ये नोकरी घेतली . नील मोहन यांनी या कंपनीत ग्लोबल क्लायंट सर्व्हिसेसचे संचालक म्हणून 3 वर्षे 5 महिने काम केले. याशिवाय सुमारे अडीच वर्षे व्हाइस प्रसिडेंट बिझनेस ऑपरेशनची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

यानंतर नील हे मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाले, येथे 4 महिने काम केल्यानंतर तो डबलक्लिक इंकमध्ये परतलs. त्यानंतर त्यांनी येथे 3 वर्षे काम केले. DoubleClick Inc नंतर, त्यांनी 2008 मध्ये Google मध्ये Senior Vice President, Display and Video Ads म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 2015 मध्ये, त्यांना YouTube चे चीफ प्रोडक्ट ऑफिसर बनवण्यात आले. आता ते युट्यूबचे सीईओ म्हणून काम पाहाणार आहेत.

टॅग्स :GoogleYouTube