जगातील निम्म्या कामगारांचा रोजगार जाणार; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा इशारा

Nearly half of global workforce risk losing livelihoods in pandemic says ILO
Nearly half of global workforce risk losing livelihoods in pandemic says ILO
Updated on

नवी दिल्ली : जगभरातील असंघटित क्षेत्रातील १.६ अब्ज कामगारांना रोजगार गमावण्याच्या संकटाचा सामना करावा लागला आहे. ही संख्या जगातील संपूर्ण कर्मचार्‍यांपैकी निम्मी आहे. म्हणजेच, जगभरातील निम्म्या कामगारांना आपला रोजगार गमवावा लागणार असल्याचा धोका आंतररष्ट्रीय कामगार संघटनेने सांगितला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने म्हटले आहे की कोरोनामुळे ४३ कोटीहून अधिक उपक्रम प्रभावित झाले असून यामध्ये किरकोळ आणि उत्पादन क्षेत्रांचा समावेश आहे. कोरोनाचा नाश झाला तरी नंतर मात्र लोकांचा नोकऱ्या घालवूनच जाणार आहे. आयएलओने म्हटले आहे की, जागतिक स्तरावर सुमारे ३.३ अब्ज कामगार आहेत. असंघटित अर्थव्यवस्थेत जवळपास दोन अब्ज रोजगार आहेत आणि हे असे कामगार आहेत ज्यांच्या नोकर्‍या सर्वाधिक धोक्यात आहेत.

जगभरातील निम्म्या कामगारांचा रोजगार जाणार; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा इशारा

साथीच्या आणि नोकरीच्या संकटामुळे या कामगारांचे जीवन निर्वाहाची व्यवस्था करणे अत्यंत महत्वाचे बनले आहे. ते म्हणाले की लाखो कामगारांकडे कमाईचं साधन नसल्याने त्यांना अन्न मिळवणं कठीण होऊन जाईल. ज्यामुळे त्यांचं भविष्य संकटात येणार असल्याची माहिती आंतरराष्ट्री कामगार संघटनेचे महासंचालक गाय रेडर यांनी दिली आहे. विशेष म्हणजे कोरोना साथीच्या आजारामुळे जगातील जवळपास एक तृतीयांश देश लॉकडाऊनमध्ये आहेत आणि बहुतेक देशांची अर्थव्यवस्था ही ढासळली असल्याचेही आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेकडून निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com