नीरव मोदी लंडनमधील अलिशान फ्लॅटमध्ये

वृत्तसंस्था
शनिवार, 9 मार्च 2019

लंडनमध्ये एका आलिशान अपार्टमेंटमध्ये निरव मोदी राहत असल्याचे 'द टेलिग्राफ'च्या वृतात सांगितले आहे. सेंटर पॉईंट टॉवरच्या थ्री बीएचके फ्लॅटमध्ये त्याचे वास्तव असल्याचा दावा केला जात आहे. लंडनमध्ये रस्त्यावर फिरताना वेगळ्याच लुकमधील नीरवशी 'द टेलिग्राफ'च्या प्रतिनिधींनी बातचितही केली.

लंडन : पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी नीरव मोदीचा अलिबागमधील किहिम समुद्रकिनाऱ्यालगत ३० हजार चौरस फुटांवरील अलिशान हा बंगाल जमीनदोस्त केला जात आहे. परंतू  दुसरीकडे परदेशात मात्र नीरव मोदीचा मुक्त संचार असल्याचे 'द टेलिग्राफ' या लंडनमधील वृत्तपत्रामार्फत समोर आले. 

लंडनमध्ये एका आलिशान अपार्टमेंटमध्ये निरव मोदी राहत असल्याचे 'द टेलिग्राफ'च्या वृतात सांगितले आहे. सेंटर पॉईंट टॉवरच्या थ्री बीएचके फ्लॅटमध्ये त्याचे वास्तव असल्याचा दावा केला जात आहे. लंडनमध्ये रस्त्यावर फिरताना वेगळ्याच लुकमधील नीरवशी 'द टेलिग्राफ'च्या प्रतिनिधींनी बातचितही केली. 

नीरम मोदीने 13 हजार कोटींचा  पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी आहे. 'सध्याच्या बाजारभावानुसार नीरव मोदीच्या या अलिशान बंगल्याची किंमत २५ कोटी असून नुकताच उध्दवस्त करण्यात आला. ईडी येथील जमिनीचा लिलाव करून बॅंकेला झालेल्या नुकसानाची भरपाई करणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neerav Modi track in flat in London