नीरव मोदीचा जामीन अर्ज चौथ्यांदा फेटाळला

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जून 2019

पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणातील कुप्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडन न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. 13 हजार कोटी रुपये लाटल्याप्रकरणी न्यायालयाने नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

वृत्तसंस्था : पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणातील कुप्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडन न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. 13 हजार कोटी रुपये लाटल्याप्रकरणी न्यायालयाने नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. 

जामीन मिळावा यासाठी मोदीने याअगोदर तीन वेळा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर जामीन मिळावा यासाठी मोदीने चौथ्यांदा अर्ज केला होता. आज (बुधवार) मोदीच्या याचिकेवर वेस्टमिन्स्टर कोर्टात सुनावणी झाली, त्यावेळी त्याचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळण्यात आला आहे. नीरव मोदी याची जामिनावर सुटका केल्यानंतर तो शरण येईल असा कोणताही ठोस पुरावा नाही, असे कोर्टाने आज झालेल्या सुनावणीदरम्यान म्हटले आहे.

लंडनला पळून गेल्यानंतर मार्च महिन्यात बँकेत खाते उघडण्यासाठी गेलेल्या नीरव मोदीला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली होती. आता त्याला भारतात आणण्यासाठी भारतीय यंत्रणा कार्यरत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neerav Modis bail application was rejected for fourth time