Iran-US War: चर्चा म्हणजे शरणागती नाही... अमेरिकेविरोधात इराणचा आक्रमक सूर, दोन्ही देशांमधला संघर्ष अधिक तीव्र?

Iran America relations: युद्ध संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत. परंतु अद्याप कोणताही अंतिम करार झालेला नाही. अमेरिकेने ६ मे रोजी इराणला १४-कलमी प्रस्ताव पाठवला.
Iran America relations

Iran America relations

ESakal

Updated on

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी म्हटले आहे की, वाटाघाटी म्हणजे कमजोरी किंवा शरणागती नव्हे. इराण आपल्या लोकांच्या हक्कांचे आणि राष्ट्राच्या हितांचे खंबीरपणे रक्षण करेल, असे त्यांनी म्हटले. युद्धामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आणि पुनर्बांधणीसाठी आयोजित बैठकीदरम्यान अध्यक्ष पेझेश्कियन यांनी हे विधान केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com