#NelsonMandela : वर्णभेदाविरोधातील 'मंडेला डे'!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

"राष्ट्रीय मुक्तिदाता आणि उद्धारकर्ता" अशी ज्यांची ओळख त्यांचा आज वाढदिवस. त्यांसे समाज कार्यातील, रंगभेदाविरोधातील योगदानाचा सन्मान म्हणून आज 18 जुलै हा दिवस 'मंडेला दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो.

"राष्ट्रीय मुक्तिदाता आणि उद्धारकर्ता" अशी ज्यांची ओळख आहे असे नेल्सन मंडेला यांचा आज वाढदिवस. त्यांच्या समाजकार्यातील, रंगभेदाविरोधातील योगदानाचा सन्मान म्हणून आज 18 जुलै हा दिवस 'मंडेला दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो.

एक रंगभेद विरोधी क्रांतिकारक, एक वर्णभेदाचे धोरण क्रांतिकारक, एक राजकारणी, एक कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष  आणि एक दू:ख दूर करण्यासाठी झटणारा माणूस "नेल्सन मंडेला" यांचा आज वाढदिवस.

18 जुलै 1918 साली त्यांचा जन्म एक खोसा थेंबू राजेशाही कुटुंबात, म्वेज़ो, ईस्टर्न केप, दक्षिण अफ़्रीका येथे झाला. त्यांनी त्यांचे वकिलीचे शिक्षण विटवाटर्रँड विद्यापीठ येथए केले. त्या ठिकाणी ते एकटेच निग्रो असल्याने त्यांना वंशवादाला सामोरे जावे लागले. रंगभेदा ते 67 वर्ष लढा देत होते, ज्यासाठी त्यांचा सन्मान अनेक पुरस्कारांनी केला गेला. रंगभेदाचा विरोध करण्यामुळे ते 27 वर्ष रॉबेन द्वीप येथील कारागृहात होते. जिथे त्यांनी कोळश्याच्या खाणित देखील काम करावे लागले होते.

नेल्सन मंडेला एक 'प्रभावी नेतृत्वाचे

दृढनिश्चयी व्हा, अभिमान आणि आत्मविश्वास बाळगा - नेल्सन मंडेला यांनी आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळेस ते कायद्याचे शिक्षण घेत होते. वर्णद्वेषासंबंधातील त्यांच्या मोहिमेमुळे त्यांना १९६२ साली अटक करण्यात आली. त्यावेळेस त्यांना पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र नंतर तिचे रुपांतर जन्मठेपेत करण्यात आले. तुरुंगातील एकांतवासात जवळपास त्यांना मरणासन्न वाटत होते. तरीही त्यांनी आपल्या मोहिमेचे कार्य़ सुरू ठेवले.

- स्वतःवर विश्वास ठेवा - जेव्हा इतर पक्षांचे नेते मंडेला यांना पापी आणि देशद्रोही संबोधत होते, तेव्हादेखील त्यांनी आपला शांततेचा आणि समानतेचा लढा सुरू ठेवला होता. सुनावणीदरम्यान मंडेला म्हणाले की, ʻमी गौरवर्णीयांच्या वर्चस्वाविरोधातदेखील लढा दिला आहे. त्याच प्रमाणे मी कृष्णवर्णीयांच्या वर्चस्वाविरोधातदेखील लढा दिला आहे.ʼ अशाप्रकारे मंडेला यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली होती.

- दाखले देऊन नेतृत्व करणे - स्वतःच्या प्रतिष्ठेबाबतची मंडेला यांची भूमिका उल्लेखनीय होती. ʻएका आदर्श लोकशाहीत आणि मुक्त समाजात प्रत्येक नागरिक एकत्रितरित्या शांततेत राहील आणि प्रत्येकाला समान संधी मिळत असेल, अशा समाजाला मी समर्थन देतो. अशा आदर्श लोकशाहीत मला राहायची इच्छा आहे आणि अशा प्रकारच्या लोकशाहीची स्थिती मला गाठायची आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nelson Mandela National Liberator and Redeemer